आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाखरांचा संसार आता प्लास्टिकच्या घरात; डॉ. जयंत वडतकर यांचा उपक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- कोणताही अतिरिक्त खर्च न करता प्लास्टिकच्या टाकाऊ कॅनपासून बनवलेले कृत्रिम घरटे जर ठिकठिकाणी लावले, तर पक्षिसंवर्धनासाठी ते महत्त्वाचे ठरू शकते, हे दिसून आले आहे. पक्षिमित्र डॉ. जयंत वडतकर यांच्या बागेतील प्लास्टिक घरट्यांमधून चिमण्यांचे आठवे कुटुंब यंदा भरारी घेणार आहे. शिवाय मैना व दयाळ पक्ष्यांनीही बागेत संसार थाटला आहे.
वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धन संघटनेचे पक्षिमित्र डॉ. जयंत वडतकर यांनी लहान आकाराच्या टाकाऊ प्लास्टिक कॅनपासून पक्ष्यांसाठी घरटे बनवले आहेत. हे घरटे चिमणीच्या पसंतीत उतरले असून, त्यांचा सारखा वावर येथे पाहायला मिळतो. यंदा आठवे कुटुंब या घरट्यातून भरारी घेणार असल्याचे डॉ. वडतकर यांनी सांगितले. आठव्या कुटुंबाच्या भरारी घेण्याचा आनंद डॉ. वडतकर यांनी व्यक्त केला आहे. घरच्या घरी चिमण्यांसाठी अगदी सहजरीत्या कृत्रिम घरटे तयार करता येईल. चिमणी संवर्धनासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

कृत्रिम घरट्यात मिळतो इतर पक्ष्यांनाही आसरा
घरकामात वापरात नसलेल्या या कॅन सामान्यत: फेकून दिल्या जातात; पण थोड्याशा कल्पकतेने त्याचाही मुक्या जिवासाठी फायदा होतो, याकडे लक्ष द्यायला व्हवे, असे डॉ. वडतकर म्हणाले. प्लास्टिक कॅनच्या घरट्यांमुळे केवळ चिमण्यांनाच फायदा होतो, असे नाही, तर साळुंकी, मैना, बुलबुल यांसारख्या पक्ष्यांनाही आपले कुटुंब सावरण्यासाठी मदत होत असते. त्यांचाही संवर्धनासाठी हातभार लावला जाऊ शकतो.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, सुरक्षित व सोपे घरटे