आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 तारखेला जिल्ह्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पंतप्रधान पदीविराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी प्रथमच अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, नऊ ऑक्टोबर रोजी त्यांची धामणगाव रेल्वे येथे सभा होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, पोलिसांकडून याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नसला, तरी मोदी यांच्या प्रचारसभेसाठी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तयारीला सुरुवात झाली आहे. अमरावती ऐवजी मोदी यांची धामणगावात सभा होत असल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

लोकसभा निवडणुकांदरम्यान नरेंद्र मोदी यांची अमरावतीतील महायुतीच्या प्रचारासाठी सायन्सकोर मैदानावर विराट सभा झाली होती. यानंतर मोदी प्रथमच जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांच्या दौऱ्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.