आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिमटाळ्याच्या मातीतून कन्याकुमारीच्या स्मारकाची प्रेरणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - बडनेरापासून अवघ्या सहा किमी अंतरावर असलेल्या टिमटाळा या गावात १०० वर्षांपुर्वी एकनाथ रानडे यांचा जन्म झाला. रानडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. त्यांच्याच पुढाकाराने कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद शिला स्मारक साकारले गेले आहे. त्यांच्या कार्याविषयी गाैरवाेद्गार करून टिमटाळा या जन्मगावी एकनाथ रानडे यांचे स्मारक बांधण्याची इच्छा खुद्द पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली आहे. यामुळे टिमटाळा गावातील ग्रामस्थसुध्दा आनंदीत झाले आहेत.

अमरावती जिल्ह्यातील टिमटाळा या जेमतेम ५०० लोकवस्तीच्या गावात १९ नोव्हेंबर १९१४ ला एकनाथ रानडे यांचा जन्म झाला. रानडे यांचे वडील रामकृष्ण रानडे हे रेल्वे विभागात कार्यरत होते. त्यावेळी ते टिमटाळा रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर होते. रेल्वेस्थानक परिसरातच रानडे कुटूंब राहत होते. त्याच ठिकाणी एकनाथ यांचा जन्म झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, नंतर बदली झाल्यामुळे रामकृष्ण रानडे कुटुंबीयांसह नागपूरला गेले. त्याचठिकाणी ते स्थायीक झाले. तेथूनच एकनाथ रानडे यांची नाळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत जुळली. संघाचे कार्य करत असतानांच वरीष्ठांनी एकनाथ रानडे यांच्यावर कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद यांच्या शिला स्मारकाची जबाबदारी सोपवली. ही जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवणार पत्र
एकनाथरानडे यांचे जन्मगाव टिमटाळा असून त्यांचे या गावात स्मारक बांधण्याची इच्छा पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी व्यक्त केली. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. स्मारक बांधण्यात यावे यासाठी आम्ही गावकऱ्यांच्यावतीने पंतप्रधानांना पत्र िलहणार आहोत. तसेच ग्रामपंचायतच्या बैठकीत स्मारक बांधण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, यासंदर्भात ठराव घेण्यात येईल. रेखामेंढे, सरपंच,टिमटाळा खिरसाना गटग्रामपंचायत

गावाच्या प्रारंभी आणि हनुमान मंदिरात लागला फलक
गावातप्रवेश करताना प्रारंभीच एकनाथराव रानडे यांचे जन्मगाव असे लिहीलेला एक फलक लागला आहे. तसेच परिसरातील ग्रामस्थानांही एकनाथ रानडे यांचे मुळ गाव टिमटाळा आहे, याची आता माहिती व्हायला लागली आहे. रानडे हे कोण होते, त्यांचे कार्य काय? ही संपुर्ण माहीती गावातील गावात येणाऱ्या प्रत्येकाला मिळावी यासाठी रास्वसंघाने मागील वर्षी गावातील हनुमान मंदीरात एक फलक लावले आहे, या फलकावर एकनाथ रानडे यांचा संपुर्ण जीवनपट मांडला आहे.