आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नातील शिळ्या अन्नातून वऱ्हाडींना बिषबाधा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांदुर रेल्वे- तालुक्यातील दहिगांव धावडे येथील मंगेश बुरडे गणेश बुरडे या दोन भावांचा विवाह ११ मे रोजी सकाळी झाला. लग्नातील सकाळचे शिळे अन्न खाऊन वऱ्हाडीला विषबाधा झाली आहे. पाहुण्यांना तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले.
बुरडे परिवारातील विवाह सोहळ्यात जमलेल्या पाहुण्यांनी लग्नातील सकाळचे अन्न सायंकाळी खाल्याने सुमारे तीन तासानंतर त्यांना मळमळ, उलट्या, हगवणीचा त्रास झाला. त्रास वाढल्याने संपूर्ण पाहुण्यांना पळसखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी नेण्यात आले. एकत्र उपचारासाठी आलेले एवढे मोठे रूग्ण पाहून कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपड झाली. वैद्यकीय अधिकारी डॉ. ठाकूर डॉ. केचे यांनी तत्काळ उपचाराला सुरूवात केली. याचवेळी दहिगांव येथेही कर्मचाऱ्यांचा एक चमू पाठवण्यात आला. कर्मचाऱ्यांनी बुरडे यांच्या घरातील पाणी आणि अन्नाचे नमुने घेतले. आरोग्यसेविकांच्या तत्परतेमुळे रूग्नांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून आले. या वेळी अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला.
नवरदेव, नववधूही रुग्णालयात दाखल
दोन्ही नवरदेव आणि नववधू यांनाही उपचारासाठी रूग्णालयात दाखल केल्याने लग्नासाठी जमलेल्या पाहुण्यांचा चांगलाच गोंधळ उडाला. पळसखेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी पाहुण्यांना दाखल करण्यात आले. उपचारानंतर रूग्णाच्या प्रक़तीत सुधारणा झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...