आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोळ्याच्या सणाला दुष्काळाचे विरजण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पावसाच्यादडीमुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीचे सावट पोळा सणावर दिसून आले. पिकांची दुरवस्था, दुबार, तिबार पेरण्या, त्यानंतरही समाधानकारक पेरण्या साधल्यामुळे समाधानकारक पिकांची आशा नसल्यामुळे पोळ्याला जिल्ह्यात उत्साह दिसून आला नाही.
शेतकऱ्यांसाठी वर्षभर राबणाऱ्या बैलाचे ऋण फेडून त्याला अभिवादन करण्याचा सण म्हणजे पोळा. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या सणावर यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे विरजण पडल्याचे चित्र दिसून आले. तालुक्याच्या बाजारातही बैलांच्या साजांची दुकाने सजली असली, तरी शेतकऱ्यांची खरेदी मंदावली असल्याचे चित्र दिसून येत होते. दरम्यान, साजसाहित्य महागल्याचीही यात भर पडल्यामुळे शेतकऱ्यांनी खिसा पाहून खरेदी केली. बाजारात शेतकऱ्यांपेक्षा चाकरमान्यांचीच गर्दी अधिक दिसून येत होती.
बैलांचा सण पोळा, माणसे झाली गोळा : पायातघुंगरांचे चाळ..डोक्यावर पिंपळाचे पान..शिंगांना नवा रंग..आकर्षक रंगीबेरंगी झूल..सुताचे रंगीत गोंडे..गळ्यात चमकणारी कमांडी, अशा साजात बैलजोड्यांसह बळीराजा सोमवारी रूरल महािवद्यालयाच्या मैदानावरील पोळा उत्साहात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते; परंतु पावसाने दडी मारल्यामुळे यंदा दुष्काळाचे सावट पोळा सणावरही बघायला मिळाले. मोजक्याच बैलजोडी बळीराजा मैदानावर दिसून आले. चिमुकली मंडळी आपल्या पालकांसह मैदानावर उपस्थित होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे मैदानावर पोळा उत्सव पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सजवण्यात आलेल्या बैलजोड्यांच्या मालकांना बक्षीस, भेटवस्तू बैलांना साज चढवण्यात आला.