आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी पकडली चार लाखांची रोकड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- फ्रेजरपुरा पोलिसांनी एसआरपीएफ वसाहतीजवळ नाकाबंदी सुरू केली होती. दरम्यान, बुधवारी रात्री एका कारमध्ये चार लाखांची रोख असल्याचे पोलिसांच्या तपासणीदरम्यान पुढे आले. ही रोख चौकशीअंती पोलिसांनी परत केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व मुख्य मार्गांवर नाकाबंदी सुरू केली आहे.
बुधवारी रात्री एसआरपीएफ वसाहतीजवळील नाकाबंदीमध्ये पोलिसांनी चांदूर रेल्वेकडून शहराकडे येत असलेल्या कारची (एमएच ०४ सीएच ६७८९) झडती घेतली. या कारमध्ये चार लाखांची रोख होती. ही रोख शहरातील मंडप डेकोरेशनचे कंत्राटदार रमेश काठोडे यांची होती. चांदूर रेल्वे येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या मंडपाचा कंत्राट काठोडे यांनी घेतला आहे. त्याच व्यवहारातील अॅडव्हान्स रक्कम चार लाख रुपये तालुकाध्यक्ष बबनराव गावंडे यांनी दिल्याचे आवश्यक कागदपत्रे पोलिसांना सादर केले. त्यामुळे ही रक्कम चौकशीअंती सोडून दिली, अशी माहिती फ्रेजरपुराचे ठाणेदार रियाजोद्दीन देशमुख यांनी दिली.
याच कारमध्ये रोख मिळून आली.