आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Case File Against Deputy Mayor Nandkishor Varahade For Abusing Mla Ravi Rana

आमदार रवि राणा यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी उपमहापौरांवर गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- उपमहापौर नंदकिशोर वर्‍हाडे यांच्यावर शुक्रवारी उशिरा रात्री राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार रवि राणा आणि वर्‍हाडे यांच्यात 13 ऑगस्ट रोजी रस्त्यावर मुरूम टाकण्यावरून वाद झाला होता. या प्रकरणी आमदार राणा यांनी दिलेल्या तक्रारीवरून वर्‍हाडेंवर गुन्हा दाखल झाला आहे. याच प्रकरणात आमदार राणांवरही गुन्हा दाखल आहे.

आमदार राणा 13 ऑगस्टला शारदानगर परिसरातील मुख्य मार्गावर कार्यकर्त्यांसह मुरूम टाकत होते. तेथे आमदार व उपमहापौर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. हा वाद चांगलाच चिघळला. आमदार राणा यांनी मारहाण, शिवीगाळ केल्याचा आणि रिव्हॉल्व्हर दाखवल्याचा आरोप त्यावेळी उपमहापौरांनी केला होता. उपमहापौरांनी तशी तक्रार राजापेठ ठाण्यात दाखल केली होती. त्या तक्रारीवरून पोलिसांनी आमदार राणांवर गुन्हा दाखल केला आहे.

आमदारांनी मागितली होती पोलिसांकडे लेखी माहिती
उपमहापौर वर्‍हाडे यांनी शिवीगाळ व मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राणा यांनी 21 ऑगस्टला तक्रार दिली होती. मात्र, उपमहापौरांवर गुन्हा दाखल न केल्यामुळे शुक्रवारी (दि. 11) आमदार राणा यांनी राजापेठ पोलिसांना लेखी माहिती मागितली होती. मात्र, त्यापूर्वीच आम्ही गुन्हा दाखल केला, असे राजापेठचे ठाणेदार संजय देशमुख यांनी सांगितले.