आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्त न्यायधीशांना फसवणारा गजाआड , अमरावती पोलिसांनी नागपुरात केला जायबंदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - औरंगाबादमधील एका कंपनीचे सुपर स्टॉकिस्ट बनवण्याची बतावणी करुन निवृत्त न्यायाधीशांची फसवणूक करणार्‍यास अमरावती गुन्हे शाखा पोलिसांनी नागपुर येथून अटक केली आहे मेहबूब खान नूर खान पठाण (वय 48) हे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

अमरावती शहरातील गाडगे नगर पोलिस ठाण्यात मेहबूब विरूद्ध गुन्हा दाखल आहे. जगदीश डोंगरे हे निवृत्त न्यायाधीश आहेत. औरंगाबाद येथे असलेल्या ‘ऑल फ्रेश फूड प्रॉडक्ट्स’ या कंपनीचे सुपर स्टॉकिस्ट म्हणून नेमणूक मिळवून देतो, अशी बतावणी करत मेहबूब याने जगदीश डोंगरे यांच्याकडून सुमारे चार लाख रूपये घेतले होते. मात्र, अनेक दिवस लोटल्यानंतरही स्टॉकिस्टशीप मिळाली नाही म्हणून डोंगरे यांनी पठाणकडे वारंवार विचारणा केली. मात्र, पठाण याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्याने डोंगरे यांना टाळण्यास सुरूवात केली. सातत्याने पाठपुरावा घेतल्यावरही पठाण याने डोंगरे यांना पैसे परत केले नाहीत. पठाण याचा संशय आल्याने जगदीश डोंगरे यांनी अमरावतीतील गाडगेनगर पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली.

पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रकरण तपासासाठी अमरावती गुन्हे शाखेकडे आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश अणे, पोलिस उपनिरीक्षक र्शीकृष्ण पारधी यांच्यासह अनिल तायवाडे, राजेश शेंबे, किशोर पंड्या यांनी तपास करून पठाण नागपुरात लपून असल्याची माहिती मिळवली. त्यानंतर गुन्हे शाखने सापळा रचत पठाण याला नागपुरातून अटक केली. न्यायालयाने पठाणला 26 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.