आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी पकडल्या अडीच हजार ‘पावट्या’ , जिल्ह्याच्या सीमेवर गुन्हे शाखेची कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्याच्यासीमेवरील देवगाव येथील दारूच्या दूकानातून परजिल्ह्यात जाणाऱ्या दोन हजार ३५२ पावट्या ग्रामीण पोिलसांच्या स्थािनक गुन्हे शाखेने पकडल्या.
दत्तापूर ठाण्याच्या हद्दीतही नाकाबंदीदरम्यान शंभर पावट्या पकडण्यात आल्या. ‘ड्राय डे’च्या दिवशी म्हणजेच गुरूवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.
तळेगाव दशासर पोिलस ठाण्याच्या हद्दीतील देवगांव येथील दारू दुकानातून नेहमीच बाभूळगाव, सावली या भागात दारूचा पुरवठा होत असल्याची माहिती पोिलस अधीक्षक वीरेश प्रभू यांना प्राप्त झाली होती. ड्राय डेच्या पूर्वरात्री ही वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याचीही माहिती होती. गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री देवगाव-यवतमाळ महामार्गावर सापळा रचला. त्याचदरम्यान, वाहन क्रमांक (एम. एच.२९ टी ५५६५) हे चारचाकी वाहन आले. त्या वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न केला; परंतु चालकाने वाहन थांबवले नाही.