आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आयुक्तालयात गटबाजी नको', पोलिस आयुक्तांनी पोलिस अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- पोलिस खात्यात उत्कृष्ट पद्धतीने काम होण्यासाठी कोणत्याही प्रकारची अंतर्गत गटबाजी नसायला पाहीजे, मात्र या ठिकाणी गटबाजी असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे तातडीने ही गटबाजी बंद करा, या शब्दात पहिल्याच क्राईम मिटींगमध्ये पोलिस आयुक्त व्हटकर यांनी पोलिस अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहे.

पोलिस आयुक्त राजकुमार व्हटकर अमरावतीत रुजू झाल्यानंतर पहिलीच क्राईम मिटींग त्यांनी घेतली. आयुक्तालयात गटबाजी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आयुक्तांनी चांगलेच धारेवर धरले. गटबाजी बंद करणे गरजेचे आहे. जर गटबाजी संपल्याचे आढळले नाही तर पोलिस महासंचालकांना सांगून गटबाजी करणाऱ्या अधिकाऱ्यांना थेट बाहेर बदली करण्यासाठी विनंती करण्यात येणार आहे. शहरात कोणत्याही ठिकाणी अवैध व्यवसाय सुरू नकोत. अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करा, जर तुम्ही अवैध व्यावसायिकांवर कारवाई केली नाही, तर मी तुमच्यावर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मागील काही महिन्यांचा गुन्हेगारी आढावा घेण्यात आला आहे. यावेळी चाेरी घरफोडींच्या गुन्ह्यांची संख्या लक्षात घेता ते उघड करण्याची संख्या अतिशय कमी आहे. ही टक्केवारी असमाधानकारक आहे. त्यामुळे गुन्हे उघड करण्याची संख्या वाढवण्याची गरज आहे. शहरातील किंवा परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करा, त्यांच्यावर लक्ष ठेवा अशा सूचनाही यावेळी आयुक्तांनी केल्या. गुन्हेगारांना शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले.
...तर वाहतूक शाखेचे कर्मचारी ठाण्यात
अमरावती तरुजू झाल्यावर मी दोन्ही वाहतूक शाखेच्या प्रमुखांना शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र अजूनही काहीही बदल झालेला नाही. कारण मी स्वत: शहरात फिरणे सुरू केले आहे. आणखी काही दिवस प्रतिक्षा करण्यात येईल. तरीही वाहतुकीत बदल झाले नाही तर वाहतूक शाखेचे सर्व कर्मचारी ठाण्यांना अटॅच करण्यात करण्यात येईल. अशी रोखठोक भूमिका घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
चांगले काम करा, मी खुश राहणार
मला खुश ठेवण्यासाठी वेगळे काही करण्याची गरज नाही. केवळ आपआपले काम योग्य पद्धतीने करून नागरिकांना समाधानी ठेवा, गुन्हे उघड करा, असे झाल्यास मी आपोआपच खुश राहणार आहे. मला खुश ठेवण्यासाठी कोणीही इतर मार्गांचा वापर करू नये. यासोबतच कोणत्याही कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांनी आर्थीक व्यवहार करू नयेत. असे आढळल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...