आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाल्यात आढळले दोन दिवसांचे अर्भक, अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिसांत तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अंजनगावबारी ते बडनेरा रोडवर पुलाखालील नाल्यात दोन दिवसांचे अर्भक आढळले आहे. रस्त्याने जाणाऱ्या महिलेला ते आढळल्यावर पोलिसांना सूचित करण्यात आले. मागील काही दिवसांमध्ये शहरात बेवारस अवस्थेत अर्भक आढळण्याची ही तिसरी घटना होय. आरोपीने अनैतिक संबंधातून हे कृत्य केले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. आरोपी अद्याप फरार असून, पोलिस शोध घेत आहेत.
अंजनगाव बारी येथील निशा दिलीप तेटू (४६) या मार्गावरून जात असताना त्यांना हे अर्भक दिसले. त्यांनी अंजनगाव बारीच्या पोलिस पाटलांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पोलिस पाटील महिलेच्या सांगण्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. अर्भकाच्या मृत्यूस कारणीभूत आरोपीविरुद्ध कलम ३१८, २०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बडनेरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक कडू, पीएसआय रामराव बडे आरोपींचा शोध घेत आहेत.
अनैतिक संबंधातून आरोपीने दृष्कृत्य लपवण्याच्या उद्देशाने त्या दोन दिवसांच्या अर्भकाचा विल्हेवाट लावण्यासाठी त्याला पुलाखालील नाल्यात टाकून दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अर्भकाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध ३१८ २०१ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बडनेरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक कडू, पीएसआय रामराव बडे त्यांचे सहकारी आरोपीचा शोध घेऊन पुढील तपास करीत आहेत.