आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर ‘त्या’ वाहनाचे वाहतूक पोलिसांनी काढले जॅमर, दंड माफ करण्याचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - बसस्थानकापासून शंभर मीटर अंतरावर उभ्या असलेल्या एका वाहनाला वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी जॅमर लावले होते. त्या वाहनमालकाला न्यायालयाने दंड ठोठावला होता. या निर्णयाविरुद्ध वाहनमालकाने वरच्या न्यायालयात धाव घेतली असता हा दंड माफ करून वाहनाचे जॅमर काढण्याचे आदेश पोलिसांना दिले. या आदेशानुसार पोलिसांनी शुक्रवारी त्या वाहनाचे जॅमर काढले आहे.

बसस्थानकाच्या दोनशे मीटर परिसरातून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. याच प्रकारे २२ नोव्हेंबर २०१४ ला बसस्थानकापासून १०० मीटर अंतरावर पांढऱ्या रंगाचे एक चारचाकी वाहन (एमएच २७ एआर ४६४४) उभे होते. या वाहनाला त्याच दिवशी वाहतूक पोलिसांनी जॅमर लावले. २२ नोव्हेंबरला ज्या वाहनाला जॅमर लावले, त्या वाहनाचा मालक जवळपास चार दिवस वाहतूक पोलिसांकडे गेलाच नाही. वाहतूक पोलिसांनी त्याला नोटीस देऊन ही माहिती दिली हे प्रकरण येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात पाठवले. या प्रकरणी निर्णय देतेवेळी न्यायालयाने वाहनमालकाला दंड सुनावला. दंडाची रक्कम अधिक आहे; तसेच वाहन पार्किंग झोनमध्येच उभे आहे, त्यामुळे वाहनावर लावलेला दंड रद्द करून वाहन सोडण्यात यावे, अशी विनंती करून वाहनमालकाने न्यायालयात धाव घेतली होती. या विनंतीचा विचार करून मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने या वाहनावरील दंड रद्द करून वाहनाचे जॅमर काढण्याचे आदेश दिले होते.
आदेशानुसार केली कारवाई
-२२नोव्हेंबरला त्या वाहनाला आम्ही जॅमर लावले आहे. न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने २८ हजारांचा दंड ठोठावला होता. न्यायालयाने नवीन आदेश देताना त्या वाहनावरील दंड रद्द करून वाहनाला लावलेले जॅमर काढण्याचे आदेश दिले आहे. न्यायालयाच्या या आदेशानुसार आम्ही शुक्रवारी त्या वाहनाचे जॅमर काढले आहे. विजयसाळुंके, पोलिसनिरीक्षक, पश्चिम शहर वाहतूक शाखा.