आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थरथरत्या काठीला मिळाली ‘खाकी’ची प्रेमळ माया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जवळपासवयाच्या सत्तरीत आलेले एक वृद्ध शहरात फिरत होते. दरम्यान, एका सर्वसामान्य व्यक्तीची त्या वृद्धावर नजर गेली. त्याने त्या वृद्धाला नाव, पत्ता विचारला; पण ते योग्य पद्धतीने सांगू शकत नव्हते. त्याचवेळी त्या व्यक्तीने या वृद्धाला राजापेठ ठाण्यात पोहोचवले. पोलिसांनी मानवतेचा परिचय देऊन त्या वृद्धाला मंगळवारी ठाण्यातच थांबवले. त्यांच्या अंथरुण, पांघरुण भोजनाची व्यवस्था करून दिली; तसेच त्यांच्या घराचा शोध सुरू केला.

मंगळवारी रात्री साडेनऊ, दहा वाजताची वेळ होती. राजापेठ ठाण्याच्या हद्दीत एका ठिकाणी अंदाजे सत्तर वर्षे वय असलेला एक वृद्ध व्यक्ती िफरत होती. थंडीमुळे वृद्ध कुडकुडत होते. त्यामुळेच त्यांना त्यांच्या हातातील काठीही नीट धरता येत नव्हती. ही व्यथा पाहून त्या सर्वसामान्य व्यक्तीने जवळच असलेल्या राजापेठ पोलिस ठाण्यात या वृद्धाला आणले. पोलिसांनीही त्या वृद्ध व्यक्तीला, नाव, पत्ता विचारला; मात्र ते सांगू शकत नव्हते. इतक्या रात्रीत अशा बोचऱ्या थंडीत वृद्ध व्यक्ती जाणार कुठे, खाणार काय? राहणार कुठे, असे अनेक प्रश्न पोलिसांपुढे उभे झाले. खाकीतही एक माणूस दडलेला असताे, हेच पोलिसांनी या घटनेतून दाखवून दिले.

त्या अनोळखी वृद्धाला ठाण्यातच सहारा दिला. त्यांना अंथरुण पांघरुण आणून दिले. जेवणही आणून दिले. दिवस उजाडल्यानंतर सकाळी त्यांना दूध दिले, केळी नाष्टा आणून दिला. पुन्हा त्यांना पोलिसांनी विचारले, त्या वेळी ते वृद्ध म्हणाले, मी सेवानिवृत्त तलाठी आहे, मला दोन मुलं आहेत. त्यांच्यासोबतच मी राहतो, मात्र मुले कुठे राहतात, तुमचे घर कुठे आहे, हे विचारले असता, त्यांना सांगताच येत नव्हते.

एवढ्यातच त्यांनी वटपूर येथील रहिवाशी असल्याचे सांगितले. वटपूर हे वर्धा जिल्ह्यात येते. त्यामुळे राजापेठ पोलिसांनी वर्धा जिल्ह्यातील पाच ते सहा पोलिस ठाण्यांना दूरध्वनीद्वारे विचारणा केली. मात्र, कुठेही त्यांच्या गावाबाबत किंवा अशी व्यक्ती हरवल्याची तक्रार नसल्याचा िनरोप पोलिसांना मिळाला. पोलिसांनी बुधवारी दुपारचेही जेवण त्यांना दिले. दरम्यान, बुधवारी रात्री त्या वृद्धाचे कुटुंबीय राजापेठ पोलिसांत पो‍होचले त्यांनी आेळख पटवत त्यांना पुन्हा त्यांच्या घरी नेले.

माणुसकी जपली
-त्यावृद्धाकडून योग्य माहिती मिळत नव्हती. मात्र, आम्ही विविध पथकांद्वारे त्यांच्या घराचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले होते. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्याचे आमचे प्रयत्न सुरू होते. परंतु, त्यांचे वृद्धत्व पाहता ठाण्यातील सर्वच कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत केली पोलिसांमधील माणुसकीचा प्रत्यय दिला. शिवाभगत, ठाणेदार,राजापेठ.

शेकोटीही पेटवली
बोचरीथंडी असल्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. त्या वृद्धांचे वय पाहता; तसेच त्यांना रात्री थंडी वाजायला लागल्यानंतर ठाण्याच्या परिसरातच पोलिसांनी त्यांच्यासाठी शेकोटी पेटवून दिली होती.