आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभारी पोलिस आयुक्त घार्गे करणार कारागृहाचे ‘ऑडिट’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पंधरा दिवसांपुर्वी नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पाच कैदी पसार झाले होते. ते अजूनही मिळाले नाहीत. त्यामुळे संपुर्ण राज्यातीलच कारागृहांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. तसेच सुरक्षा यंत्रणांची तपासणी सुरू झाली. यामुळेच अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे सुरक्षा ऑडीट करण्याचे आदेश राज्याच्या तुरूंग अतिरीक्त पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी प्रभारी पोलिस आयुक्त सोमनाथ घार्गे यांना दिले आहेत. त्यामुळेच शनिवारी (दि. २५) प्रभारी आयुक्त घार्गे कारागृहाचे सुरक्षा ऑडीट करणार आहेत.

अमरावती मध्यवर्ती कारागृहातसुध्दा सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे. मात्र नागपूरसारखी घटना वांरवार होवू नये म्हणून सुरक्षा ऑडीट पोलिसांकडून करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रभारी पेालिस आयुक्त घार्गे शनिवारी सकाळी १०.३० वाजतापासून सायंकाळी वाजेपर्यंत कारागृहाचे सुरक्षा ऑडीट करणार असल्याची माहीती प्राप्त झाली आहे.