आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Summoned Shivaji Education Society Chairman, Secreatary

पोलिसांनी ‘शिवाजी’च्या अध्यक्ष, सचिवांना बोलवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मागील पाच दिवसांपासून डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन पदाचा वाद सुरू आहे. यामध्ये संस्थेने अद्याप तोडगा काढला नाही. भविष्यात या वादामुळे एखादी मोठी घटना होऊ नये म्हणून पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

या विषयावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी डॉ. जाणे, डॉ. सोमवंशी यांच्यासह पोलिसांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सचिवांना आयुक्तालयात बोलावले आहे. तसे पत्र पोलिसांकडून त्यांना दिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. डॉ. जाणे डॉ. सोमवंशी यांच्यात पीडीएमसीच्या डीन पदासाठी वाद सुरू आहे. या प्रकरणी डॉ. जाणे यांनी शनिवारीच गाडगेनगर पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर सोमवार मंगळवारी ‘कुलूप वाॅर' सुरू होते. यामध्ये तोडगा निघावा म्हणून पोलिसांनी बुधवारी डॉ. दिलीप जाणे डॉ. पद्माकर सोमवंशी यांना चर्चेसाठी बोलावले होते, या वेळी डॉ. सोमवंशी पोहोचले. मात्र, डॉ. जाणे बुधवारी उपायुक्त घार्गे यांच्याकडे आले नाही. या प्रकरणावर संस्थेकडून अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे गुरुवारी या प्रकरणात संस्थेचे अध्यक्ष अॅड. अरुण शेळके, सचिव वि. गो. भांबुरकर यांनी उपस्थित राहिल्यास तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

संस्थेला पत्र दिले
पीडीएमसीडीन पद प्रकरणात तोडगा निघावा यासाठी संस्थेला पत्र देऊन अध्यक्ष सचिवांना बोलावले आहे. याचवेळी डॉ. जाणे डॉ. सोमवंशी यांनासुद्धा बोलावले आहे. सोमनाथघार्गे, पोलिस उपायुक्त