आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसच निघाला चोर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - बडनेरा येथील प्रा. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्‍ड रिचर्स सेन्टरमध्ये मंगळवारी मध्य रात्री एकाने संगणक चोरीचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षारक्षकांना ही बाब लक्षात येताच त्यांनी चोरट्याला पकडण्याचा प्रयत्‍न केला असता चोरट्याने दुचाकी तेथेच सोडून पळ काढला.
दुचाकीच्या आधारे गुन्हे शाखेने शोध घेतला असता चोरीचा प्रयत्न करणारा चोरटा हा खुद्द पोलिस कर्मचारी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवारी (दि. २५) गुन्हे शाखेने त्या पोलिस कर्मचाऱ्याला पकडून बडनेरा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मात्र गुरुवारी
रात्रीपर्यंत त्याला अटक झाली नव्हती.
ताब्यात घेतलेला हा कर्मचारी ग्रामीण पोलिस दलात कार्यरत आहे. सध्या तो राखीव पोलिस दलात नेमणूकीस आहे. मंगळवारी मध्यरात्री बडनेरा येथील प्रा. राम मेघे इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्‍ड रिचर्स सेन्टरमधील यांत्रिकी विभागातील एक संगणक चोरून नेण्याचा प्रयत्न झाला होता. याचवेळी या महाविद्यालयातील सुरक्षारक्षक गस्तीवर होते. त्यांना चोरीची चाहूल लागताच त्यांनी शोध घेतला असता एक व्यक्ती संगणक घेवून जात असताना दिसले.
सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो संगणक सोडून पळाला. यावेळी सुरक्षा रक्षकासोबत त्याची झोंबाझोंबी झाली. यातच त्याचा मोबाइल त्या ठिकाणी पडला. तसेच त्याची दुचाकी महाविद्यालयातच उभी होती. या प्रकरणी डॉ. चंद्रशेखर अंबादास धोटे यांनी मंगळवारी मध्यरात्रीच बडनेरा पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता दुचाकी (क्रमांक एम. एच. २७ एके ६७४६) महाविद्यालयाच्या परिसरात उभी होती तसेच मोबाइल मिळून आला. या दुचाकीच्या चालकानेच चोरीचा प्रयत्न केल्याचे महाविद्यालयातील ज्या सुरक्षारक्षकांची त्याच्यासोबत झोंबाझोंबी झाली होती त्यांनी पोलिसांना सांगितले.
बातम्या आणखी आहेत...