आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political Leaders Healing To Farmer, News In Divya Marathi

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला सरसावली नेतेमंडळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - गेल्या तीन दिवसांच्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्यांच्या मदतीसाठी गुरुवारी काँग्रेस व शिवसेनेचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. दोन्ही पक्षांच्या प्रतिनिधी मंडळांनी महसूल प्रशासनाच्या प्रमुखांच्या स्वतंत्रपणे भेटी घेऊन तत्काळ व योग्य प्रमाणातील मदतीची मागणी केली.

तिवसा मतदारसंघातील नागरिकांसह आमदार अँड. यशोमती ठाकूर यांनी विभागीय आयुक्त दत्तात्रय बनसोड यांची भेट घेऊन शेतीपिकांच्या नुकसानाची तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी केली, तर शिवसेनेचे माजी आमदार संजय बंड यांनी निवासी उपजिल्हाधिकारी तेजूसिंग पवार यांची भेट घेत अतिवृष्टीने दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रतिमृत व्यक्ती पाच लाख रुपये देण्यासह इतर नुकसानग्रस्तांना तत्काळ मदतीची मागणी केली.

आमदार ठाकूर यांच्या प्रतिनिधी मंडळात पंचायत समिती सदस्य ज्योती यावलीकर, ब्राrाणवाडा गोविंदपूरचे सरपंच निचित, युवक काँग्रेसचे वैभव वानखडे, हरीश मोरे व रावसाहेब राऊत, गजानन जवंजाळ, दिलीप सोनोने या पदाधिकार्‍यांसह वलगाव, रेवसा, पुसदा, धामोरी, देवरी, नांदुरा लष्करपूर, रोहणखेड, फाजलापूर, कामुंजा, वझरखेड, काटपूर, जळका हिरापूर आदी गावांतील नागरिक उपस्थित होते.

दुसरीकडे संजय बंड यांच्या प्रतिनिधी मंडळात जिल्हाप्रमुख नाना नागमोते, उपशहरप्रमुख अमोल निस्ताने, पं.स. सदस्य आशीष धर्माळे, गजानन डोंगरे, प्रवीण अळसपुरे, उमेश घुरडे, अनिल नंदनवार, अशोकराव कैथवास, श्रीनिवास सरडे, राजूभाऊ तायडे, सचिन पिंजरकर, साहेबराव चौधरी, पवन लुंगे, अनिल मोहोड, जयकुमाप उमाठे, गोवर्धन अलोने, गंगाधर तरारे आदींचा सहभाग होता.
2007 पासून पुनर्वसन रखडले
रेवसा व लगतच्या गावांतील नागरिकांचे पुनर्वसन 2007 पासून रखडले आहे. गेल्या काही वर्षांत अत्यंत पोटतिडकीने हा प्रश्न मांडण्यात आला; परंतु अजूनही तडीस गेला नाही. तो लवकर निकाली निघाला पाहिजे. अँड. यशोमती ठाकूर, आमदार, तिवसा.

वीज अधिकार्‍यांवर व्हावी कारवाई
वीज अधिकार्‍यांनी त्यांच्या कामात हयगय केली. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच झाडांची छटाई केली असती, तर कदाचित झाडे कोसळून विजेच्या तारा तुटल्या नसत्या, तर वीजप्रवाह खंडित झाला नसता. काही ठिकाणी तीन दिवसांपासून गायब असलेला वीज पुरवठा केवळ त्यांच्यामुळे आहे. संजय बंड, जिल्हाप्रमुख, शिवसेना.