आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Amravati, BJP Student Party Strike Issue At Amravati, Divya Marathi

कशाचं काय, आगीत भाजला पाय.!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- कशाचं काय अन् आगीत भाजला पाय, असं म्हणण्याचा प्रसंग भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांवर रविवारी ओढवला. यात दोन कार्यकर्त्यांचे पाय भाजल्याने त्यांना रुग्णालयात न्यावे लागले.

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर नितेश राणे यांनी टीका केली. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले. अशातच राणे यांचा सायंसकोर मैदानावर रोजगार मेळावा होता. राणे अमरावतीत येत असल्याची संधी साधत भाविसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा मुहूर्त साधला. राणे यांच्या विरोधात पोस्टर जाळण्यासाठी ते राजकमल चौकात एकत्र आलेत. पोस्टरवर पेट्रोल ओतून कार्यकर्त्यांनी आग लावली खरी; परंतु पेट्रोल ओतताना झालेले दुर्लक्ष आंदोलकांच्या अंगलट आले. पेट्रोलचा भडका उडाला. यात प्रवीण दिधाते आणि सुनील राऊत या कार्यकर्त्यांचा पाय जळाला. या घटनेमुळे आंदोलकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. आग विझवून दोघांही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शहर प्रमुख संजय पळसोदकर यांच्या नेतृत्वात संघटक प्रवीण दिधाते, युवासेना उपशहर प्रमुख सुनील राऊत, प्रवीण अंबाडेकर, श्याम शेळके, वैभव इंगोले, जयेश पडोळे, आदींनी सहभाग नोंदवला.