आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Mns, Ncp Party Issue At Amravti

‘मनसे’चा दम; राकाँचे वेटगेन! इच्छुकांची उत्सुकता शिगेला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आघाडीच्यावाटाघाटीत राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यभरात १६ मतदारसंघ वाढवून मिळाल्यामुळे अमरावतीकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे किमान एक मतदारसंघ तरी वाढवून मिळेल, असे राकाँच्या अंतर्गत गटाचे म्हणणे आहे.
आघाडीत असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने अलीकडेच जागा वाटपांवर शिक्कामोर्तब केले. त्यानुसार काँग्रेसच्या वाट्याला १५८ तर राष्ट्रवादीच्या वाट्याला १३० मतदारसंघ आले आहेत. मागील वेळच्या तुलनेत राकाँचा आकडा १६ ने जास्त आहे. त्यामुळे वाढीव १६ मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील किमान एक मतदारसंघ तरी असेलच, असा स्थािनक राकाँ नेत्यांचा अंदाज आहे.

जुन्या समीकरणानुसार अमरावती जिल्ह्यातील आठपैकी मोर्शी बडनेरा हे दोनच मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कोट्यात आहेत. मध्यंतरीच्या काळात जेव्हा राष्ट्रवादीने राज्यस्तरावर निम्म्या (१४४) जागांचा होरा लावला होता, त्यावेळी अमरावती जिल्ह्यातील किमान चार मतदारसंघ आमच्या वाट्याला येतील, असे स्थािनक नेत्यांचे म्हणणे होते.

आता चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मतदारसंघाचे वाटप अदला-बदलीच्या प्रक्रियेनंतर दोनचे किमान तीन होतील, अशी संबंधित नेत्यांची खात्री आहे. विशेष असे की, नुकत्याच पार पडलेल्या मुंबई येथील मुलाखत अभियानात जिल्ह्याच्या आठही मतदारसंघातील इच्छूकांनी हजेरी लावली होती. त्यामुळे उमेदवारांची यादी घोिषत होताना या सर्वांच्याच अपेक्षा पल्लवीत झाल्या आहेत. अंतिम चित्र, काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे.
मनसे फोडणार प्रस्थापितांना घाम
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात सात उमेदवार उतरवण्याचे ठरवले आहे. मागील विधानसभेत त्यांनी काही मतदारसंघांमध्ये दखलयोग्य कामगिरी केली होती. आगामी निवडणुकीत ते चांगले उमेदवार आखाड्यात उतरवणार असल्यामुळे चुरशीची शक्यता आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीतील वाढीव जागांमधून जिल्ह्याच्या पारड्यात किती वजन पडणार, असाही प्रश्न आहे.