आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Nationalist Congress Party Issue, Divya Marathi

राष्ट्रवादी सदस्यांच्या हृदयाचे वाढले ठोके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- महापालिका स्थायी समिती सभापती निवडणुकीची तारीख जवळ येत असताना राष्ट्रवादी कॉँग्रेस सदस्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. निवडीबाबत पक्षांतर्गत खलबते सुरू आहेत. मात्र, अंतिम निर्णय पक्ष नेतृत्वच घेणार आहे.

निवडणूक मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित आहे. महापालिका प्रशासनाने त्यासाठीची तयारी सुरू केली आहे. मंगळवारच्या (दि. 18) सर्वसाधारण सभेत रिक्त झालेल्या जागांवर नव्याने नऊ सदस्यांची निवड करण्यात आली. नवीन सदस्यांच्या निवडीची घोषणा झाल्यानंतर सभापतिपदासाठीची समीकरणे बदलली आहेत. यामुळे इच्छुक नगरसेवकांच्या लांबलेल्या यादीला पूर्णविराम मिळाला आहे. सभापतिपदी महिला विराजमान होणार असल्याचे संकेत पूर्वीपासूनच मिळत आहेत, मात्र, स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये चारपैकी तीन महिला सदस्य आहेत.

सभापतिपदी कोण विराजमान होणार, याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झाले नाही. सदस्यांची नावे घोषित करताना सर्वांना सांभाळून घेण्याबाबतीची कसरत गटनेत्यास करावी लागली. सभापतिपदासाठी सर्वच इच्छुक असल्याने पक्षनेतृत्वासमोर मोठा पेच पडला आहे. सभापतिपदावरून राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये अंतर्गत खलबते वाढली असून, याबाबत पक्ष नेतृत्व काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवडीबाबत अद्याप चर्चा नाही
स्थायी समिती सभापतिपदी कोणाची निवड केली जाईल, याबाबत अद्याप निर्णय नाही. महिला आरक्षणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्तता केली असून, 50 टक्के नाही तर तीन महिला सदस्य पाठवून 75 टक्के आरक्षण दिले आहे. पक्षामध्ये सभापती निवडीबाबत अंतिम निर्णय पक्षर्शेष्ठींकडून घेतला जाणार आहे. अविनाश मार्डीकर, गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस.

विभागीय आयुक्तांना पत्र
स्थायी समिती सभापतिपदाचा कार्यकाळ एक मार्च रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे स्थायी समिती सभापतिपदासाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाला महापालिकेकडून पत्र पाठवण्यात आले आहे. दोन मार्च ते सहा मार्चदरम्यान सभापतिपदाची निवडणूक होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.