आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Rana Couple Is Having Crores Of Property, Divya Marathi

राणा दाम्पत्य कोट्यधीश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवार नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणुकीसाठी बुधवारी कोणताही गाजावाजा न करता नामांकन अर्ज दाखल केला. त्यांच्याकडे 11 लाखांच्या वाहनासह एकूण एक कोटी 78 लाख रुपये, तर त्यांचे पती आमदार रवि राणा यांच्याकडे तीन वाहने आणि एक कोटी 12 लाख रुपयांची संपत्ती आहे. नामांकन दाखल करताना निवडणूक आयोगाकडे त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रात हे स्पष्ट केले आहे.
नवनीत राणा यांनी सूचक सुनील राणा यांच्यामार्फत बुधवारी जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रंजन महिवाल, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण ठाकरे यांच्याकडे नामांकन अर्ज दाखल केला. नामांकनासोबत जोडण्यात आलेल्या शपथपत्रामध्ये नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांनी त्यांच्या संपत्तीचे विवरण जाहीर केले. त्यानुसार, राणा दाम्पत्याकडे दोन कोटी 91 लाख 18 हजार रुपयांची संपत्ती आहे. नवनीत राणा यांच्याकडे 11 लाख रुपये किमतीचे टोयाटो फॉच्यरुनर, तर आमदार राणा यांच्याकडे इन्डेव्हर, होंडा सिटी, महिंद्रा बोलेरो.
आदी वाहने आहेत. नवनीत राणा यांच्याकडे 25 लाख 57 हजार रुपयांची जंगम, तर एक कोटी 42 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. रवि राणा यांच्याकडे 38 लाख 27 हजार रुपयांची जंगम, तर 78 लाख 50 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. शहरात शिवजयंतीची धूम असताना नवनीत राणा यांनी दाखल केलेल्या उमेदवारी चर्चेची ठरली आहे. यांसह राहुल मोहोड यांनीही बुधवारी नामांकन अर्ज दाखल केला.
संपत्तीचे विवरण
नवनीत राणा आमदार रवि राणा रोकड 1,40,000 1,15,000
पॉलिसी ---- 14,70,000
वाहन फॉच्यरुनर इन्डेव्हर, होंडा सिटी, बोलेरो
दागिने 780 ग्राम सोने (23,00,240 ) 78 ग्राम सोने (2,40,000)
एकूण 36,18,819 38,27,743
शेती --- पुसला, मोर्शी (1 हे. 1 आर)
वाणिज्यिक इमारत --- बेनोडा
निवासी इमारत 1)ओशिवारा, मुंबई शंकरनगर (गंगा-सावित्री)
2) गोरेगाव गार्डन इस्टेट
एकूण 1,42,00,000 78,50,000
वाढ आणि विशेषत: आधुनिक घरांमध्ये नसलेली नैसर्गिक वातानुकूलनाची सोय यामुळे चिमण्या कमी झाल्या आहेत. सिमेंटच्या जंगलामुळे घरट्यासाठी गवताची काडी मिळणेही शहरात कठीण झाले आहे. जागतिक चिमणी दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पक्षी अभ्यासकांनी चिमण्यांची सुरक्षा आणि संवर्धनासाठी योग्य प्रयत्न न झाल्यास त्या नामशेष होण्याचा धोका व्यक्त केला आहे.
चिमण्यांचे संवर्धन होण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज आहे. घराच्या उंचावरील खिडक्या, सज्जा, घराची गॅलरी, बगीचामधील झुडपे, मोठी झाडे अशा सुरक्षित स्थळी चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी लावावीत, असे आवाहन पक्षी अभ्यासकांनी केले आहे.