आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Wikhe Patil News Issue, Divy Marathi

काँग्रेस हायकमांड व्हाया विखे पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात झालेल्या कुरबुरी, तक्रारींचा पाढा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापुढे गुरुवारी वाचण्यात आला.
स्थानिक विर्शामगृहावर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पदाधिकार्‍यांसह आमदारांनीही एकमेकांविरोधात मोठय़ा प्रमाणात तक्रारी केल्या.
महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणासाठी विखे पाटील अमरावतीत आले होते. पालकमंत्रिपदाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामार्फत काँग्रेस हायकमांडपर्यंत तक्रारी पोहोचवण्याची ही धडपड विर्शामगृहावर गुरुवारी दुपारी दोनपर्यंत सुरू होती. या वेळी जिल्ह्यातील सत्ताधारी आघाडीतील जबाबदार पदाधिकारीही आघाडीवर होते. विखे पाटील यांची भेट घेणार्‍यांमध्ये काँग्रेसच्या वसुधा देशमुख, बबलू देशमूख, आमदार यशोमती ठाकूर, र्शीराम नेहर, अनंत अत्रे, नरेशचंद्र ठाकरे, ज्ञानेश्वर दाभाडे, जयंत वानखडे तर राष्ट्रवादीच्या सुरेखा ठाकरे, नितीन हिवसे, चंद्रशेखर देशमुख, नितीन मोहोड, यांचा समावेश होता.
सुकाणू समिती निर्णय घेईल
लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्‍यांमध्ये झालेल्या वादावर विस्तृत अहवाल पदाधिकार्‍यांकडून मागवला आहे. राज्यपातळीवरील सुकाणू समितीत या तक्रारींची चर्चा होईल. सध्या तरी कोणीही तक्रार केली नाही. राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री