आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political Propaganda, Latest News In Divya Marathi,

शहरात राजकीय प्रचारासाठी फिल्मीगिरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध पक्षांची भूमिका रंगारंग जाहिरातींच्या माध्यमातून टीव्ही तसेच वृत्तपत्रांमधून मांडली जात आहे. आता या जाहिरातींचा शिरकाव चित्रपटगृहांमध्ये झाला आहे. चित्रपट सुरू होण्यापूर्वी सत्ताधारी व प्रमुख विरोधी पक्षांची जाहिरात शहरातील बहुतांश चित्रपटगृहांमध्ये झळकत आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी प्रचाराची सर्वच माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचण्याचा धडाका लावला आहे. आता चित्रपटगृहांमधूनही राजकीय जाहिरातबाजीस सुरुवात झाली आहे. शहरातील जवळपास सर्वच सिनेमागृहांमधून प्रेक्षकांना नेतेमंडळींचे दर्शन घडत आहे. या जाहिराती थेट सॅटेलाइटच्या साहाय्याने प्रदर्शित होत असल्याचे चित्रपटगृह व्यवस्थापकांचे म्हणणे आहे. कॉँग्रेस पक्षाकडून ‘कॉँग्रेस का हाथ, आम आदमी के साथ’ ही जाहिरात प्रदर्शित होत आहे.
भाजप आणि कॉँग्रेससोबतच लवकरच केजरीवाल यांच्या ‘आप’चीही जाहिरात चित्रपटात गृहांतून पाहायला मिळेल, अशी आशा चित्रपटगृहांच्या व्यवस्थापकांना आहे. प्रेक्षकांना या जाहिराती सुखावत आहेत.