आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीवर आचारसंहितेतही जाहिरातबाजी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाही एसटी महामंडळाच्या बसेसवर राजकीय जाहिरातबाजी सुरूच आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करत महामंडळाच्या बसेस सर्रासपणे रस्त्यावरून धावत आहेत.

दरम्यान, आचारसंहिता लागली, की राजकीय पक्षांची पोस्टर्स सरकारजमा करावी लागतात. परंतु एसटी महामंडळाला अजूनही जाग आली नसल्याचेच दिसून येत आहे. काही वाहनांवरील पोस्टर्स थातूरमातूर पद्धतीने काढण्यात आली असून, काही बसेसवर ती अद्यापही कायम असल्याचेच दिसून येत आहे. याबाबत महामंडळ प्रशासनासोबत संपर्क साधला असता, बसेसवरील ही जाहिरात फलकं, पोस्टर्स काढण्याचे काम युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र, रविवारी अनेक बसेसवर शासनाच्या जाहिराती आढळून आल्या. नागरिकांनीही कारवाई सुरु आहे तर पोस्टर्स निघाले का नाहीत, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

युद्धपातळीवर काम सुरू आहे
आचारसंहिता लागताच युद्धपातळीवर मोहीम राबवून बसेसवरील पोस्टर्स काढण्यात आली.िवभागीय कार्यशाळेतील चमूंनी प्रत्येक आगारात जाऊन हे काम केले. अमरावती आगारातील बहुतांश वाहनांवरील पोस्टर्स काढली आहेत.आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेऊ. नीलेश बेलसरे, आगार व्यवस्थापक.

पोस्टर्स सरकारजमा
आचारसंहितालागताच चौकाचौकांतील पोस्टर्स सरकारजमा झालीत. त्यामुळे, फलकांनी कोंडलेला शहराचा श्वास मोकळा झाला आहे. २५ ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता असल्यामुळे झाकोळलेले शहराचे सौंदर्य काही दिवसांपुरते तरी शाबूत राहणार आहे.