आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्लील संभाषणाची सीडी सादर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - मुख्य डाकघराचे सहायक डाक अधीक्षक प्रमोद शंभरकर यांनी केलेल्या अश्लील संभाषणाची सीडी मंगळवारी पोलिस आयुक्त अजित पाटील यांना देण्यात आली. ज्या महिलेशी हे संभाषण करण्यात आले होते, तिनेच ही सीडी आयुक्तांना देऊन शंभरकरविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

पोलिस आयुक्तांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले असून संबधित महिलेला शहर कोतवालीत रीतसर तक्रार दाखल करण्यास सांगण्यात आले. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी सात सप्टेंबरला महिलांशी असभ्य वर्तनाच्या आरोपातून मारहाण केली होती. मात्र, शंभरकर यांनी आरोप नाकारले होते.