आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Power Supply Discontinuous,latest News In Divya Marathi

निवडणुका जोरात, कास्तकार घोरात, कमी दाब खंडित वीजपुरवठ्याचा ग्रामीण भागात कहर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-मोर्शी- एकापाण्याअभावी सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे. उर्वरित पिके जगवण्यासाठी विजेची नितांत गरज आहे; परंतु कमी दाब खंडित वीजपुरवठ्यामुळे धड अर्धा एकरही ओलित होत नसल्यामुळे पिके जगवावी तरी कशी, असा गहन प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
शेतक-यांच्या हिताच्या बाता करणारे आता एकमेकांवर चिखल उडवून विधानसभेची खुर्ची मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. निवडणुकीच्या या धबडग्यात मात्र शेतक-यांच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न दुय्यम ठरला आहे. त्यामुळे शेतक-यांमध्ये तीव्र संताप खदखदत असून, याचा परिणाम ग्रामीण भागात होणाऱ्या प्रचार सभांवर प्रकर्षाने जाणवत आहे.
जिल्ह्यात यावर्षी सोयाबीनचा पेरा सर्वाधिक आहे. एकरी पाच ते सहा हजार रुपये क्विंटलचे बियाणे विकत घेऊन शेतक-यांनी पेरण्या केल्या होत्या; परंतु सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने अनेक शेतक-यांना सोयाबीन कपाशीचीही दुबार-तिबार पेरणी करावी लागली. यासाठी एकरी दहा ते पंधरा हजार रुपये अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांना सहन करावा लागला. पेरण्या झाल्यानंतरही महिनाभर पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांचे पीक नेस्तनाबुत झाले. अशा भयानक विपरीत अवस्थेतही शेतकऱ्यांनी मिळणाऱ्या किरकोळ विजेच्या भरवशावर रात्रंदिवस ओलित करून सोयाबीन, कपाशी, तुरीचे पीक जोमाने वाढवली होती. परंतु दाणे भरण्याच्या अवस्थेत पावसाने परत दडी मारल्याने जिल्ह्यातील बहुतांश सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे. अशा स्थितीत उर्वरित कपाशी, तूर संत्र्याच्या पिकावर शेतकऱ्यांची दारोमदार होती. त्यातही वाढलेल्या तापमानामुळे संत्राची 50 ते 60 टक्के फळगळती होऊन हजारो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.
शेतक-यांनादुहेरी भुर्दंड मनस्ताप
कमीदाबाच्या वीजपुरवठ्यामुळे शेकडो शेतकऱ्यांचे पंप जळत आहेत. मशीन दुरुस्तीसाठी वेळ लागत असून, नवीन पंप खरेदीची आर्थिक कुवत नसल्यामुळे शेतक-यांना पिकाचे नुकसान दुरुस्तीचा खर्च असा दुहेरी भुर्दंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
संत्रा,कपाशीला जबर फटका
जिल्ह्यातकोरडवाहू क्षेत्र सर्वाधिक आहे. यात पाण्याअभावी रब्बीच्या पिकांना जबर फटका बसला आहे. सध्या कपाशी फळे फुलांच्या अवस्थेत असताना पाऊस गायब झाल्याने कोरडवाहू पट्ट्यात कपाशीसह तुरीलाही जबर फटका बसणार आहे. चांदूर बाजार, अचलपूर, अंजनगावसुर्जी मोर्शीच्या काही भागात संत्र्याचे आंबिया बहाराचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या तालुक्यातील आंबिया बहार गारपिटीच्या तडाख्यातून वाचला होता. परंतु वाढलेल्या तापमानामुळे ऑगस्ट महिन्यात 50 ते 80 टक्के फळगळती झाली. यात कोट्यवधी रुपयांची हानी झाली. दरम्यान, मोर्शी, वरुड तालुक्यातील मृग बहार आधीच गारद झाला आहे. त्यातही उर्वरित आंबिया बहाराची संत्री वाचवण्यासाठी शेतक-यांचा प्रयत्न आहे. परंतु विजेअभावी हा संत्राही अडचणीत आला आहे.

अकरावीत शिकणा-या मुलाला सोबत घेऊन रात्री जीव धोक्यात घालून ओलीत करणारा चिंचोली गवळी शिवारातील एक शेतकरी .मिळणारी तुटपुंजी वीज वाया जाऊ नये म्हणून जिल्ह्यातील शेतकरी रात्री शेतात वावरत असल्याने सर्पदंशाच्या घटना वाढीस लागल्या आहेत.
चाळीस एकरांत दुबार पेरणी
मीचाळीस एकर शेतात दुबार पेरणी केली आहे. कसे तरी पीक हाताशी आले; परंतु आठ तास वीज त्यातही खंडित वीजपुरवठ्यामुळे दिवसभरात धड अर्धा एकरही ओलित होत नसल्यामुळे कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. संजयसोनटक्के, मोर्शी
दोन तासही मिळत नाही वीज
यावर्षीपावसाच्या दगाबाजीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. आहे ती पिके वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहेत; परंतु धड दोन तासही वीज मिळत नसल्यामुळे पिके कशी जगवावी, अशा भीषण प्रश्न आहे. निरंजनबागडे, चिंचोलीगवळी.