आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज भारनियमन कमी करा; अन्यथा करणार आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जीवघेण्या उकाड्यात शहरात भारनियमन वाढल्याने भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणचे अधीक्षक-अभियंता दिलीप घुगल यांना भारनियमन कमी करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली. महावितरणने लक्ष न घातल्यास आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.
उकाड्याच्या पार्श्वभूमीवर भारनियमनाच्या चटक्यांमुळे अमरावतीकर त्रस्त झाले आहेत. घुगल यांनी दोन्ही पक्ष कार्यकर्त्यांची समजूत घालून पाऊस आल्यास दोन दिवसांत; अन्यथा किमान सात दिवसांत भारनियमन कमी करण्याचे आश्वासन दिले. भाजप शहराध्यक्ष तुषार भारतीय आणि मनसे शहराध्यक्ष संतोष बद्रे यांच्या नेतृत्वात समस्या मांडण्यात आल्या. अंबागेटच्या आतील परिसर, स्मशान गंज, वडाली, गांधीनगर, विलासनगर यांसह अनेक भागांत अघोषित भारनियमन सुरू आहे. काही भागांत दिवसातून दोनदा भारनियमन करण्यात येत आहे, असे अधीक्षक-अभियंत्यांच्या लक्षात आणून देण्यात आले. या वेळी तुषार भारतीय, चेतन गावंडे, प्रशांत शेगोकर, मुन्ना सेवक आदी भाजप कार्यकर्ते, तर संतोष बद्रे, तुषार तायडे, नवाज भाई, राम काळमेघ, संजय नोपत आदी मनसे नेते, कार्यकर्ते यांनी निवेदन सादर केले.