आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सार्मथ्यशाली राष्ट्रासाठी सक्षम युवकांची गरज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती-स्वामी विवेकानंद यांच्या विचारांप्रमाणे युवक हा राष्ट्रउभारणीचा कणा आहे. सार्मथ्यशाली देश घडवण्यासाठी चारित्रसंपन्न, निर्व्यसनी आणि सक्षम युवकांची आज गरज आहे, असा सूर बियाणी चौकातील समाजकार्य महाविद्यालयात आयोजित वक्तृत्व स्पर्धेत शुक्रवारी उमटला.

राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत क्रीडा व युवक सेवा विभाग उपसंचालक कार्यालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा दिन व युवा सप्ताहाचे 12 ते 19 जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत परिसंवाद व वक्तृत्व स्पर्धा पार पडली. ‘युवकांसमोरील आव्हाने, समस्या व उपाय’, ‘आधुनिक तंत्रज्ञान - युवकांसाठी वरदान’ आणि ‘सक्षम राष्ट्रउभारणीसाठी माझी भूमिका’ अशा विषयांवर विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण मते मांडली. स्पध्रेच्या युगात ध्येयप्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी झटले पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्याचा चांगल्या कामासाठी उपयोग केला पाहिजे, अशा मुद्दय़ांवर स्पर्धकांनी प्रकाश टाकला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप काळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. देशाच्या विकासासाठी प्रयत्न करणे प्रत्येक युवकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी स्वामी विवेकानंद यांचे विचार आत्मसात करावेत, असे ते म्हणाले. क्रीडा उपसंचालक जयप्रकाश दुबळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेंद्रसिंह ठाकूर, प्रा. अशोक ठाकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. संदीप चिस्तळकर आणि र्शीकृष्ण पखाले या स्पध्रेचे परीक्षक होते. राजगुरू शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. छात्रसंघ सचिव दीपिका हजारे हिने आभार मानले. जयप्रकाश दुबळे यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. प्रा. नामदेव भगत यांनी ‘रोजगार, व्यवसाय व नोकरीमधील संधी’ या विषयी मार्गदर्शन केले.

बक्षिसाचे मानकरी
आकाश वैराळे, विनय पदलमवार व रवि आठवले यांना वक्तृत्व स्पध्रेत अनुक्रमे तीन बक्षिसे मिळाली. 22 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या स्पध्रेत सहभाग घेतला होता.

दोन दिवसीय स्नेहसंमेलन

समाजकार्य महाविद्यालयामध्ये शुक्रवारपासून दोन दिवसीय स्नेहसंमेलनाला सुरुवात झाली आहे. संगीत खुर्ची, कविसंमेलन, अंताक्षरी व छात्ररजनी या बहारदार कार्यक्रमांचे याप्रसंगी आयोजन करण्यात आले आहे. प्रा. अशोक ठाकरे, प्रा. ठाकूरचंद बमनोटे, छात्रसंघ प्रतिनिधी र्शीकृष्ण पखाले, मयूर वैद्य यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी स्नेहसंमेलनासाठी पर्शिम घेत आहेत.