आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर केला "प्रहार'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - येथीलएमआयडीसीमध्ये कार्यरत कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार संघटनेतर्फे गुरुवारी (दि. २५) सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. सहाय्यक कामगार उपायुक्त डी. बी. जाधव यांच्याशी चर्चा करून आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला. आठवडाभरात निर्णय झाल्यास प्रहार स्टाईल आंदोलन केले जाईल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
भविष्य निर्वाह निधी, वैद्यकीय सेवा आदी विविध शासनाच्या सुविधा या कामगारांना मिळाव्यात यासाठी प्रहारने पुढाकार घेतला आहे. परंतु या सर्व सुविधा मिळण्यासाठी कामगारांची कार्यालयात नोंदणी असणे गरजेचे आहे. परंतु या कार्यालयाने एकाही कर्मचाऱ्याची नोंदणी केली नसल्याचा आरोप प्रहारचे धीरज जयस्वाल यांनी केला.
वारंवार पाठपुरावा करुनही या कार्यालयाकडून याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करण्यात येत होते, असे जयस्वाल यांनी सांगितले. चर्चेदरम्यान प्रहारचे छोटू महाराज वसू, प्रदीप निमकाडे, प्रदीप चांगोले, जोगेंद्र मोहोड, मित्रविंद पुरोहित, चंदु खेडकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिकाऱ्यांशी चर्चा करताना प्रहारचे पदाधिकारी.
अधिकाऱ्यांना खुर्चीला बांधू
उपायुक्तजाधव यांनी तत्काळ कामगारांची नोंदणी करून घ्यावी. आठ दिवसात तसे झाल्यास त्यांच्यासह इतर अधिकारी यांना खुर्चीला बांधून ठेवणार. धीरजजयस्वाल.
बातम्या आणखी आहेत...