आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबेडकरी चळवळ आयसीयूतून बाहेर काढा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमरावती- आंबेडकरीजनतेनेच चळवळ आयसीयूमध्ये नेऊन टाकली आहे. त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्या पक्षांना नेस्तनाबुत करून चळवळीला बळ देण्याची संधी या निवडणुकीत आल्याने ती आयसीयूतून बाहेर काढा, असे आवाहन मंगळवारी (दि. 7) अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
भारिप-बहुजन महासंघाचे तिवसा येथील उमेदवार अय्याजभाई मोर्शी येथील अरुण चव्हाण यांच्या प्रचार सभेत आंबेडकर बोलत होते. व्यंकटेश सभागृहात आयोजित सभेत ते म्हणाले, बहुजन समाज पक्ष शाहू, फुले, आंबेडकरी जनतेची दिशाभूल करीत आहे. भाजप काँग्रेस पक्षावरही आंबेडकर यांनी टीका केली. व्यासपीठावर जानराव मनोहर, सतीश यावले, धर्मपाल सोनटक्के, अनिल भरडे आदी उपस्थित होते. सागर भवने यांनी संचालन, तर हिमालय मनोहर यांनी आभार मानले. सभेला तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.