आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prime Minister Narendra Modi,latest News In Divya Marathi

देशाचे पंतप्रधान प्रथमच चांदूर रेल्वेत, 35 एकर जागेवर पोलिसांचा खडा पहारा, कडेकोट सुरक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांदूर रेल्वे- देशाचेपंतप्रधान प्रथमच प्रचार सभेनिमित्त शुक्रवारी (दि. 10 ) शहरात येत असल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, पोलिस बंदोबस्त ठेवण्यासाठी आतापासूनच प्रशासन कामाला लागले आहे. यापूर्वी इंदिरा गांधी, एच. बी. देवेगौडा यांनीही शहराला भेटी दिल्या होत्या; परंतु त्या वेळी दोघेही पदावर नव्हते. नरेंद्र मोदी मात्र पदावर असताना चांदुर रेल्वेला भेट देणारे पहिलेच पंतप्रधान ठरणार आहेत.
धामणगाव रेल्वे-चांदूर रेल्वे मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अरुण अडसड यांच्या प्रचारासाठी मोदी येथे येत आहेत. 1982 मध्ये इंदिरा गांधी सुधाकर सव्वालाखे तर देवेगौडा पांडुरंग ढोले यांच्या प्रचारासाठी शहरात आले होते. त्या वेळी इंदिरा गांधी देवेगौडा पंतप्रधान पदावर नव्हते. त्यामुळे पदावर असताना शहरात येणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरणार आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये परिसरात कमालीची उत्सुकता पसरली आहे. मोदी यांच्या सकाळी सव्वा अकरा वाजता होणाऱ्या सभेसाठी कुऱ्हा रोडवरील 35 एकर शेतात तयारी करण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन कामाला लागले आहे.
सध्या शहराला छावणीचे रूप आल्याने मैदानावरील तयारी पाहण्यासाठीही नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. सर्व विभागांतील पोलिस अधिकाऱ्यांचा सध्या शहरात राबता आहे. पोलिस अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांनी सभास्थळावर भेटी देऊन सुरक्षा आयोजनाच्या तयारीचा आढावा घेणे सुरू केले आहे.
कुऱ्हा मार्गावरील 35 एकरांच्या भूखंडावर सभेची जोरदार तयारी सुरू आहे.
पोलिसांनी घेतले प्रचार सभास्थळ ताब्यात
कुऱ्हामार्गावर असलेले 35 एकरांचे शेत ले-आउट असलेल्या भूखंडावर मोदी यांची सभा होणार आहे. सभास्थळाच्या सुरक्षेसाठी सध्या 800 पोलिस तैनात करण्यात आले आहेत. गुप्तचर यंत्रणा, सीआयडी, विशेष पोिलस पथके, कमांडो आदी यंत्रणा सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी छत्तीसगडच्या पोिलस यंत्रणेलाही पाचारण करण्यात आले आहे.
तीनिजल्ह्यांमधील उमेदवारांसाठी सभा
चांदुररेल्वे शहर, वर्धा, यवतमाळ अमरावती या तीनही जिल्ह्यांतील सीमेवर येते. त्यामुळे तीनही िजल्ह्यांतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मध्यवर्ती शहर म्हणून चांदुर रेल्वेची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे येथे तीनही जिल्ह्यांतील नागरिक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता असल्याने चोख व्यवस्था ठेवण्यात येत आहे.
गडकरींची आज शेंदूरजना घाट येथे सभा
अमरावती: मोर्शी-वरुड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. अनिल बोंडे यांच्या प्रचारासाठी बुधवारी (दि. 8) केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी शेंदूरजनाघाट येथे येणार आहेत. पोलिस ठाण्याच्या बाजूला असलेल्या मैदानावर दुपारी एक वाजता गडकरी यांची सभा होणार आहे.