आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prime Minister, With Chief Minister Leaders Statue Set Fired

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह नेत्यांचे प्रतीकात्मक पुतळे जाळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: पत्रकार परिषदेत आंदोलनाची माहिती देताना वामनराव चटप यांच्यासह पदाधिकारी.
यवतमाळ - वेगळ्या विदर्भाची लढाई आता आणखी तीव्र करण्याचा निर्धार विदर्भवाद्यांनी केल्याचे दिसून येत आहे. येत्या मे ला तर पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच नितीन गडकरी यांचे प्रतीकात्मक पुतळे जाळण्याचा फतवा विदर्भ राज्य आंदोलन समितीने जारी केला आहे. या आंदोलनाची माहिती समितीचे नेते, माजी आमदार वामनराव चटप यांनी दिली.
भाजप नेते नितीन गडकरी यांनी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी केंद्रात सत्ता आल्यास वेगळा विदर्भ देण्याचे आश्वासन दिले होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा सातत्याने वेगळा विदर्भ देण्याचे आश्वासन दिले आहे. केंद्रातील सरकारनेसुद्धा सत्तेवर येण्यापूर्वी जाहीरनाम्यात वेगळा विदर्भ देण्याचे अभिवचन दिले आहे. असे असतानाही हे नेते आज मात्र विदर्भाच्या विकासाच्या गप्पा मारून वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न करत अाहेत, असा आरोप चटप यांनी केला. पत्रकार परिषदेला बाळासाहेब निवल, विजय कदम, अॅड. अजय चमेडिया, मंगलबाबू चिंडालिया, प्रकाश पांडे, रफिक रंगरेज, प्रदीप श्रावणकर, पुरुषोत्तम पाटील उपस्थित होते.

नेत्यांचेप्रतीकात्मक पुतळे जाळणार : याआंदोलनासाठी विदर्भवाद्यांना सोबत घेतले जात आहे. जांबुवंतराव धोटे यांच्यासोबतसुद्धा या विषयावर चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर यवतमाळातील प्रतीकात्मक पुतळे जाळण्याचे ठिकाण स्पष्ट करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगिातले. महाराष्ट्र दिन काळा दिवस म्हणून पाळणार असल्याचेसुद्धा त्यांनी सांगितले.

राज्याची स्थिती खराब
राज्यावरकोट्यवधी रुपयांचे कर्ज आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार करायलासुद्धा सरकारजवळ पैसा नाही. नोकर भरती बंद केली आहे. विकासकामे प्रभावित झाली आहे. २३ हजार कोटी तर फक्त कर्जाचे व्याज द्यावे लागत आहे. विदर्भातील सिंचन प्रकल्प पूर्ण करायला ५४ हजार कोटींची गरज आहे. पैसेच नसल्याने प्रत्यक्षात त्यांनी फक्त हजार कोटींची तरतूद केली आहे. अशा अवस्थेत महाराष्ट्रासोबत राहून विदर्भाचा विकास होणे आता शक्य नाही. त्यामुळे आता वेगळ्या विदर्भाशिवाय पर्याय नसल्याचे चटप यांनी स्पष्ट केले.