आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाजगी कर्ज काढून पूरग्रस्तांचा निवारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- पेढी नदीला आलेल्या महापुरामुळे देवरा गावाला मोठे नुकसान पोहोचले होते. त्याला आता सात वर्षे झाली. 126 जणांचा निवारा त्यात वाहून गेला होता. या पूरग्रस्तांना तीन वर्षांपूर्वी भूखंड मिळाले व 20 हजार रुपयांचा एक धनादेश मिळाला. बस्स.! त्यानंतर शासकीय मदत मिळाली नाही. त्यांच्यावर रस्त्यावर राहण्याची वेळ आली. संसार उघड्यावर येऊ नये, यासाठी काहींनी कर्ज काढून बांधकामास सुरुवात केली आहे.
पूरग्रस्तांच्या घरकुलासाठी एक भूखंड देण्यात आला. प्रत्येकाला 900 वर्गफूट जागा देऊन 20 हजारांचा धनादेश हाती ठेवण्यात आला. मात्र, इतक्या पैशांत झोपडीसुद्धा तयार होत नसून, घरकुल कसे होईल, असा प्रश्न गावकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे. काहींनी पुराच्या पाण्यामुळे जीर्ण झालेल्या घरालाच मातीचा आधार देऊन सात वर्षे प्रतीक्षा केली. अनेक घर कोणत्याही क्षणी कोसळतील, अशा परिस्थितीत आहेत. त्यामुळे त्यांना नाइलाजास्तव खासगी कर्ज काढून निवारा उभारण्याचे काम हाती घ्यावे लागले आहे.

प्रत्येक नवीन व्यक्तीत आशेचा किरण : गावात आलेल्या एखाद्या नवीन व्यक्तीने पूरग्रस्तांची सहज चौकशी केली तरी कुणी शासकीय अधिकारीच मदतीसाठी धावून आल्याचा समज येथील धावून आला की काय, असाच येथील ग्रामस्थांचा समज होतो. या समस्या सोडवण्यासाठी कुणी शासकीय अधिकारी येईल, या आशेवर असलेल्या ग्रामस्थांना जेव्हा सत्य कळते, तेव्हा मात्र ते निराश होतात.