आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेव्हण्यानेच केला जावयाचा खून, दोघांना अटक; मुख्य मारेकरी पसार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- पोहराजंगलात तीन दिवसांपूर्वी करण्यात आलेला हॉटेल व्यावसायिकाचा खून आर्थिक व्यवहारातून त्याच्या मेव्हण्यानेच मित्रांकडून करवून घेतल्याचे पोलिस तपासातून पुढे आले आहे. गुन्हे शाखा पथकाने शुक्रवारी मध्यरात्री हॉटेल व्यावसायिकाच्या मेव्हण्यासह अकोट येथील एकाला अटक केली आहे. मात्र, मुख्य मारेकरी अजूनही पसारच आहेत.
मो. नईमुद्दीन ऊर्फ राजा मो. नसरुद्दीन (३५, रा. अन्सारनगर), वीरेंद्र दर्यासिंग रघुवंशी (३१, सरस्वतीनगर, अकोट) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. मुख्य मारेकरी मोसीन कलाम मो. वसीम (३२, रा. अकोट, ह. मु. बोरिवली, मुंबई) हा पसार आहे. मृतक अ. नसीम अ. सत्तार (४५, रा. अन्सारनगर) यांचा राजा हा मेव्हणा आहे. नसीमचा मृतदेह तीन सप्टेंबरला दुपारच्या वेळी चांदूर रेल्वे मार्गावरील पोहरा जंगलात आढळला होता. राजा शहरात फळांचा व्यवसाय करतो. अकोट येथील वीरेंद्र रघुवंशी, मोसीन कलाम हे त्याचे मित्र आहेत. दोन सप्टेंबरला राजा अकोट येथे वीरेंद्र रघुवंशी यांच्याकडे गेला होता. त्याची पत्नीसुद्धा अकोटची आहे. त्याने मुंबई येथील मोसीन कलाम याला अकोट येथे बोलावून घेतले आणि तिघांनी अ. नसीम अ. सत्तारला संपवण्याचा कट रचला. वीरेंद्रने अकोट येथील शरद पडोळे यांच्याकडून इंडिका (एमएच ३० एएफ १९४९)भाड्याने घेतली. वीरेंद्र मोसीन कलाम हे दोघे इंडिकाने वलगाव येथे आले. मोसीन कलाम याने एक भूखंड खरेदी करायचा असून घालून दुचाकीने नंदा मार्केट परिसरातील रुग्णालयात पोहोचले. येथे कैलास जोधराम सैनी यांना सहा हजार रुपये िदले. साडेतीन लाख रुपयांची बॅग पारेख यांच्या हातातच होती. त्यांनी बॅग पुन्हा िडकीत ठेवली. दरम्यान, एका दुचाकीवर दोन चोरटे आले. मागे बसलेल्या चोरट्याने पारेश यांच्या हाताला धक्का देऊन साडेतीन लाखांची रोख असलेली बॅग लंपास केली. पारेख यांनी पाठलाग केला. मात्र, चोरटे पसार झाले.
मो. इमरान असल्याचे त्यांना आढळले. त्याच्याकडे कट्टा आढळला. मात्र, काडतूस मिळाले नाहीत. या प्रकरणी वलगाव पोिलसांत गुन्हा नोंद केला. पोलिस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक थोरात, दिलीप वाघमारे, संजय बाळापुरे, चैतन्य रोकडे, प्रणय वाघमारे, दीपक श्रीवास, संदीप देशमुख आदींनी ही कारवाई केली.