आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच वर्षांत वाढली अडसूळ, गवई यांची मालमत्ता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- लोकसभेच्या रिंगणातील उमेदवार खासदार आनंदराव अडसूळ मागील पाच वर्षांत दीड कोटींची, तर त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ. राजेंद्र गवई यांच्या संपत्तीत तीन कोटी 42 लाखांची वाढ झाली आहे.नामांकन अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रानुसार, अडसूळ यांच्याकडे तीन कोटी 25 लाख 257 रुपयांची मालमत्ता आहे. मागील निवडणुकीच्या वेळी त्यांची एकूण चल-अचल संपत्ती एक कोटी 76 लाख 8 हजार 418 रुपये इतकी होती. त्यांच्या नावे विदर्भ प्रिमीअर हाउसिंग सोसायटीसह 15 लाख 87 हजार 104 रुपयांची देणी आहेत. खासदार अडसूळ व त्यांच्या पत्नीकडे मागील निवडणुकीच्या वेळी एक कोटी 31 लाख 64 हजार 295 रुपयांची अचल संपत्ती होती. यावेळी ती वाढून एक कोटी 84 लाख 56 हजार 359 रुपयांवर पोहोचली आहे.
अर्थात पाच वर्षांत आनंदराव अडसूळ यांनी घर, दुकाने व इतर वाणिज्यिक इमारती आणि शेतीमध्ये 52 लाख 92 हजार 64 रुपयांची वाढ नोंदवली आहे. 2009 च्या निवडणुकीच्या वेळी त्यांच्या नावे केवळ सहा इमारती होत्या. आता या वेळेस त्या दोनने वाढल्या आहेत.
बँक खाती, इतर वित्तीय संस्थांमधील गुंतवणूक आणि जड-जवाहिरांमध्येही अडसूळ यांनी वाढ केली आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळी त्यांच्या नावे केवळ तीन बँकांची खाती होती. या वेळी ती वाढली आहे.
शिवाय त्यांच्याकडे असलेल्या दाग-दागिन्यांच्या किमती वाढल्यामुळे या वेळची त्यांची एकूण चल संपत्ती एक कोटी 41 लाख 39 हजार 898 रुपयांवर पोहोचली आहे. 2009 मध्ये ही संपत्ती केवळ 44 लाख 44 हजार 123 रुपये होती. या दोन रकमांमधील अंतर 96 लाख 95 हजार 775 रुपये आहे. दरवाढ हे ही संपत्तीच्या वाढीचे कारण आहे.