आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्त, कलेक्टर करबुडवे, मालमत्ताधारकांना जप्तीनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- विभागीयआयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, अप्पर जिल्हाधिकारी किशोर कामुने यांच्या शासकीय निवासस्थानांवर मालमत्ता कराची मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याची बाब समोर आली आहे. कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या बारा मालमत्ता जप्त करण्याबाबत महापालिकेकडून जप्तीनामादेखील जारी करण्यात आला आहे.
‘ऑन दी स्पॉट असेसमेंट’सह मालमत्ता कर वसुलीकडेदेखील महापालिका प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. उत्तर झोन क्रमांक कृष्णानगर अंतर्गत दहा हजार रुपयांच्या वर कर थकीत असलेल्या मालमत्ताधारकांची यादी प्रशासनाकडून तयार करण्यात आली आहे. दहा हजार रुपयांच्या वर कर थकीत असलेल्या कृष्णानगर झोनमध्ये तब्बल ८२ मालमत्ता तर जप्तीनामा काढलेल्या बारा, अशा एकूण ९४ थकबाकीदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २००५ पासून मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ता धारकांचा या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. कॅम्प परिसरातील विभागीय आयुक्त, जिल्हािधकारी, अप्पर जिल्हािधकाऱ्यांचे निवास, पशुसंवर्धन उपसंचालक कार्यालयांसह काही शाळांचादेखील यामध्ये समावेश आहे. स्थानिक संस्था करातून अपेक्षेप्रमाणे उत्पन्न प्राप्त होत नसल्याने मालमत्ता कर वसुलीकडे महापालिका प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. वेळेवर कराचा भरणा करणाऱ्या मालमत्तांवर दोन टक्के, तर वार्षिक २४ टक्के व्याजदेखील आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरदेखील अनेक मालमत्ताधारकांकडून कराचा भरणा केला जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. आयुक्त अरुण डोंगरे यांच्याकडून मालमत्ता कर वसुलीकडे विशेष लक्ष दिले जात असल्याने पाचही झोनचे सहायक आयुक्त मोहिमेवर निघाले आहेत. कर्मचाऱ्यांचे वेतन, कंत्राटदारांची देणी, नगरसेवकांचे मानधन, पालिकेतील दैनंिदन कामकाजासाठी लागणारे साहित्य याकरिता मोठ्या प्रमाणात उत्पन्नाची गरज आहे. खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी असल्याने महापालिकेच्या तिजोरी िरकामी झाली अाहे. अशा स्थितीमध्ये कोणत्या बाबींवर खर्च करावा, याबाबतदेखील महापालिकेत मोठ्या काटकसरीने निर्णय घेतला जात आहे.

वसुलीतबडनेरा आघाडीवर : मालमत्ताकर वसुलीत दक्षिण झोन (बडनेरा) सद्य:स्थितीत अव्वल आहे. महापालिकेच्या एकूण साडेसहा कोटी रुपयांच्या वसुलीत एकट्या बडनेरा झोनकडून तब्बल दोन कोटी रुपये मालमत्ता कराच्या रूपात वसूल केले आहे. बडनेरा, कृष्णानगर मध्य झोनच्या तुलनेत अन्य दोन झोन मात्र मागे पडल्याचे दिसून येत आहे.