आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Provision For Three Crore Rs For Dryland Farming

कोरडवाहू शेतीसाठी तीन कोटींची तरतूद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जिल्ह्यातील कोरडवाहू शेती अभियानात कृषी साहित्य वाटपाकरिता सव्वातीन कोटी रुपयांच्या अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यातील १३ गावांमध्ये हे अभियान राबवण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाच्या अहवालात देण्यात आली आहे. या अभियानाअंतर्गत कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांना अनुदानावर कृषी साहित्याचे वाटप करण्यात येते.
या व्यतिरीक्त शेततळ्यांच्या माध्यमातून संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. अभियानाच्या माध्यमातून कोरडवाहू शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, कृषी अवजारे, शेतमालासाठी वाहन, दालमिल, पॅकहाऊस, शेडनेट हाऊस, पाइप, विद्युत अथवा डिझेल पंपसेट, ठिबक अथवा तुषार सिंचन संच, प्लास्टिक क्रेट्स, हरितगृह इत्यादी वैयक्तिक लाभाच्या घटकांचा अनुदानावर पुरवठा करण्यात येतो. २०१३-१४ दरम्यान एक कोटी ३९ लाख, २०१४-१५ दरम्यान तीन कोटी ५३ लाख रुपये जिल्ह्यात अनुदान देण्यात आले. या हंगामाकरिता तीन कोटी २२ लाख रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव सादर केला आहे.
कोरडवाहू क्षेत्र विकास अंतर्गत दीड कोटी
राष्ट्रीय शास्वत शेती अभियानाअंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास हा कार्यक्रम मागील वर्षीपासून जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील भगुरा, अचलपूरमधील जानोरी आणि मोर्शी तालुक्यातील काटपूर या तीन गावांची निवड करण्यात आली आहे. या योजनेत पशुधन खरेदीकरिता ५० टक्के अनुदान देण्यात येते. या व्यतिरीक्त चेक डॅम, सामूहिक शेततळे यांसारख्या सिंचनाचे स्त्रोत निर्माण करण्याकरिता १०० टक्के अनुदान देण्यात येते.
गांडूळ खत प्रकल्प, मधूमक्षिका पालन, भुसूधारणा, जुन्या पाणी स्त्रोताचे बळकटीकरण, पाणी उपसा साधने, पाइप, शेततळे अस्तरीकरण, पॅकहाऊस, हरितगृह, इत्यादी घटकांकरिता ५० टक्के अनुदान देण्यात येते. २०१४-१५ मध्ये या अभियानाअंतर्गत अमरावती जिल्ह्यात एक कोटी नऊ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. २०१५-१६ करिता जिल्ह्यातील पाच गावांची निवड करण्यात आली असून, यावर खर्च करण्यासाठी एक कोटी ४८ लाख रुपयांचा आराखडा सादर करण्यात आला आहे, अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे.