आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरी सुविधांचे तीन तेरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महसूल कर्मचारी व तलाठ्यांचे लेखणी बंद संपून दिवसही लोटला नाही तोच मंगळवारी जिल्हाभरातील नगरपालिकांच्या कर्मचार-यानी काम बंद करून अमरावतीत मोर्चा काढला. त्याच वेळी जिल्हा परिषद व राज्य शासनाच्या अखत्यारीतील रुग्णालयांच्या डॉक्टरांनी धरणे आंदोलनात सहभागी होत कर्तव्याला फाटा दिला. दोन वेगवेगळ्या आंदोलनांनी नागरी सुविधांचे तीन तेरा वाजले असून रोजच्या संप, टाळेबंदीमुळे अमरावतीकरांचे जगणे असह्य झाले आहे.

बदल्यांमुळे गैरसोय झाल्याच्या कारणावरून जिल्हाभरातील तलाठी, मंडळ अधिकारी (आरआय) व तलाठ्यांनी आठवडाभरापासून आंदोलनास्त्र उपसले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी या तिन्ही संवर्गातील कर्मचाऑंनी ‘लेखणी बंद’ आंदोलन केले. त्यामुळे शेती व शैक्षणिक कामांसाठी आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या दाखल्यांपासून सामान्य नागरिकांना वंचित राहावे लागले. सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असूनही तहसील, तलाठी, एसडीओ व कलेक्ट्रेटमध्ये कोणतीही कामे झाली नाहीत. त्यापाठोपाठ दुसऑ दिवशी मंगळवारी जिल्ह्याच्या आरोग्य सेवेतील सुमारे 80 टक्के डॉक्टरांनी काम बंद ठेऊन जिल्हा कचेरीवर धरणे दिले. यातील काही सहकाऑंनी एक दिवसापूर्वीच मुंबई गाठून तेथील आंदोलनात सहभाग नोंदवल्यामुळे सोमवारपासूनच आरोग्य सेवा विस्कळीत झाली होती. दुसरीकडे नागरी सुविधा पोहचवणाऑ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (नगरपालिका) कर्मचाऑंनी मोर्चा काढत रोजच्या कामांपासून फारकत घेतली.

दोन्ही प्रमुख यंत्रणांच्या या आंदोलनांमुळे सामान्य नागरिक अक्षरश: भरडला गेला. नगरपालिका असलेल्या शहरांमध्ये सकाळची साफसफाई झाली नाही. शिपायापासून सारेच कर्मचारी मोर्चाला गेल्यामुळे नगरपालिकांच्या शाळेची घंटा वाजवण्यापासून झाडपूसही शिक्षकांनाच करावी लागली...

जिल्हाधिकारी कार्यालयावर डॉक्टरांचे धरणे
महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या (मॅग्मो) नेतृत्वात डॉक्टरांनी लढा सुरू केला आहे. 2009-10 मध्ये सेवा समावेशन झालेल्यांना पूर्ववत लाभ द्या, बीएएमएस व बीडीएस उत्तीर्ण अस्थायी डॉक्टरांचे समायोजन करा, वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ आरोग्य अधिकाऑंना उच्च वेतन लागू करा, बीएएमएस अधिकाऑंना पदोन्नती द्या, निवृत्तीचे वय 58 वरून 62 वर्षे करा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. आंदोलनात नरेंद्र सोळंके, किशोर देशमुख, सुरेश थोरात, अनिल झामरकर, सचिन गोळे, गणेश मालखेडे, रवींद्र सिरसाठ, श्रीकांत झाकर्डे, सारिका बोरकर, शुभांगी राऊत, सुषमा डोंगरे, वैशाली निस्ताने, जयश्री देशमुख, अश्वीनी पवार, सुनिता हिवसे, अंजू दामोधरे, सविता सरदार, भावना गमे, रश्मी चौहाण, माया तायडे, स्वाती खडसे आदी डॉक्टर सहभागी झाले आहेत.

नगरपरिषद कर्मचा-यानी मोर्चा काढला
अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्ह्यातील दहाही नगरपालिकांच्या कर्मचाऑंनी कलेक्ट्रेटवर मोर्चा काढला. भारतीय मजदूर संघ (बीएमएस) व सिटूच्या नेतृत्वातील सर्व कर्मचारी संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या. निवृत्त कर्मचाऑंना 100 टक्के वेतन द्या, रोजंदारी कर्मचाऑंना कायम करा, सफाई कामगारांना मोफत घरे द्या, मुख्याधिकाऑंची 50 टक्के पदे नगरपालिका कर्मचाऑंमधून भरा, कालबद्ध पदोन्नती तत्काळ लागू करा आदी मागण्यांसाठी हा मोर्चा होता. म.रा. नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या बॅनरखाली काढण्यात आलेल्या या मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष अनिल तायडे, सचिव विजय देशमुख, कार्याध्यक्ष रवींद्र खंडेझोड, राज्य उपाध्यक्ष प्रल्हाद कोतवाल, गणेश खडके, राजेंद्र भोंगे, पुरुषोत्तम घाटे, नितीन इमले, महंमद जावेद, शैलेंद्र जळकोटे, अब्दुल अजीज आदींनी केले.
म्हणून हा अप्रिय निर्णय
- डॉक्टरांच्या मागण्या तत्वत: मान्य करीत आगामी दहा दिवसांत त्यावर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यामुळे या महिन्याच्या प्रारंभी घोषित आंदोलन स्थगित करण्यात आले. परंतु, महिनाभराचा कालखंड संपल्यानंतरही शासनाला जाग आला नाही. त्यामुळे नागरिकांच्या गैरसोयीबाबत खेद व्यक्त करीत संघटनेला आंदोलनाचा अप्रिय निर्णय घ्यावा लागला.

फोटो - डॉ. किशोर बोबडे, मुंबई येथील आंदोलनात सहभागी झालेले स्थानिक प्रतिनिधी.
जिल्हाभरातील नगरपालिकांच्या कर्मचाऑंनी काम बंद आंदोलन करीत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. छाया : शेखर जोशी.