आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या बाळांना द्या पल्स पोलिओचा डोस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- पोलिओ मुक्तभारताचे स्वप्न साकार करण्यासाठी रविवारी ( दि. १८) पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. शहरात त्यासाठी ३०५ सार्वजनिक िठकाणी तात्पुरती केंद्रे उघडण्यात आली आहेत. सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत ही केंद्रे सुरू राहतील. याशिवाय बसस्थानक, रेल्वे स्टेशन या ठिकाणीही ही व्यवस्था राहील. दरम्यान, शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ डोज देणे आवश्यक आहे.
यासाठी मनपाने १२ शहरी आरोग्य केंद्रे, आयसोलेशन हॉस्पिटल, मोदी हॉस्पिटल, सावित्रीबाई फुले सूतिकागृह येथेही व्यवस्था केली आहे. आरोग्य िवभागासह िवविध िवभागांचे ८०७ कर्मचारी िनयुक्त केले आहेत.
...तरीही बाळाला द्यावा डोस
शून्यते पाच वयोगटांतील बालकांना यापूर्वी कितीही वेळा पोिलओची औषध िदली असेल, तरीही त्याला आजच्या मोहिमेत सहभागी करून घ्या. बाळ आजारी असेल, नुकतेच जन्मलेले असेल, कुठल्याही कारणाने ते िनस्तेज अशक्त वाटत असेल; तरीही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला पोलिओचा डोज देणे सोईचे आहे. डॉ.श्यामसुंदर सोनी, वैद्यकीयआरोग्य अधिकारी, मनपा, अमरावती.