आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Puruswotm Khedkar Spech In Amravati To Social Topic

बहुजनांनी मेंदू शाबूत ठेवावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(संगीत सूर्य केशवराव भोसले सभागृहात आयोिजत मराठा सेवा संघाच्या मेळाव्याला अशी भरभरून उपस्थिती होती.)
अमरावती- मनुष्याला जगण्यासाठी जशी अन्नाची नितांत आवश्यकता आहे, तशीच मेंदूचा विकास होण्याचीही गरज आहे. प्रत्येकच मनुष्याला मेंदू असतो. परंतु, केवळ मेंदू असूनही चालत नाही, त्या मेंदूचा योग्य विकास होणे महत्त्वाचे आहे. मेंदूचा योग्य विकास झालेला व्यक्तीच समाज परिवर्तनासासाठी उत्तम योगदान देऊ शकतो. त्यामुळे बहुजनांनी आपला मेंदू सदृढ आणि शाबूत ठेवावा,असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी रविवारी केले.

जिल्ह्यातील सेवा संघाचे कार्य वृद्धिंगत करण्यासाठी शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेच्या संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात रविवारी अमरावती शाखेतर्फे जिल्हा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी उपस्थित समुदायाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बहुजन समाजाला एकसंघ करून चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी मराठा सेवा संघाची स्थापना करण्यात आली. हा संघ केवळ कुठल्या एका माणसाचा नसून समाजात परिवर्तनासाठी कटिबद्ध असल्याचे खेडेकर यांनी सांगितले. तत्पूर्वी मेळाव्याचे उद््घाटन मराठा सेवा संघाचे अध्यक्ष कामाजी पवार यांच्या हस्ते झाले.
अध्यक्षस्थानी महासचिव मधुकरराव मेहकरे, तर प्रमुख पाहुणे जिजाऊ ब्रिगेडच्या छाया महल्ले, मनोज आखरे, अशोक राणा, रेखा खेडेकर, विजया कोकाटे, दिलीप साबळे, अविनाश कोठाळे, अरविंद गावंडे, डॉ. राजेंद्र कोकाटे, अॅड. गणेश हलकारे, सचिन चौधरी प्रभाकर झोड आदी उपस्थित होते. प्रास्तविक जिल्हाध्यक्ष हरिभाऊ लुंगे, संचालन चंद्रकांता मोहिते यांनी केले. सतीश काळमेघ यांनी आभार मानले. मेळाव्याला कार्यकर्ते नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवल्याने सभागृह खचाखच भरले होते.

मराठा सेवा संघाने विश्वाला काय दिले ?
उद््घाटनसमारंभानंतर पहिल्या सत्राला सुरुवात झाली.“मराठा सेवा संघाने विश्वाला काय दिले ’? यावर विचारवंत तथा लेखक गंगाधर बनबरे यांनी विचार मांडले.अध्यक्षस्थानी नीळकंठ बांबल, तर प्रमुख पाहुणे गजानन चौधरी योगिराज घोटेकर होते. दुसऱ्या सत्रात अमोल मिटकरी यांनी ‘परिवर्तनवादी विचारांची उपयुक्तता काळाजी गरज’ विषयावर मार्गदर्शन केले.अध्यक्षस्थानी प्रेमकुमार बोके, तर प्रमुख पाहुणे डॉ. अभय गावंडे संजय ठाकरे होते. प्रदीप वानखडे, संदीप गावंडे यांनी पहिल्या, तर तुषार देशमुख, अजिंक्य काळे यांनी दुसऱ्या सत्राचे संचालन केले.
सायंकाळी झाला समारोप
मराठा सेवा संघाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान असलेले सभासद पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचे खेडेकर यांनी कौतुक केले. अध्यक्षस्थानी डॉ. गणेश पाटील, तर प्रमुख पाहुणे कीर्तीमाला चौधरी, कांचन उल्हे, शीला पाटील होते. संचालन सीमा देशमुख, तर उज्ज्वल गावंडे यांनी आभार मानले.
यांची होती प्रमुख उपस्थिती
पालकमंत्रीप्रवीण पोटे , खासदार आनंदराव अडसूळ, आमदार डॉ. सुनील देशमुख, आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, आमदार डॉ. अनिल बोेंडे, आमदार अॅड. यशोमती ठाकूर, महापौर रिना नंदा, माजी आमदार सुलभा खोडके, कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके तथा मराठा सेवा महासंघाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.