आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून प्रकरणात दोघांना अखेर जन्मठेपेची शिक्षा, पुसद न्यायालयाचा निकाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुसद- पुसद तालुक्यातील धुंदी येथील एका व्यक्तीला पुलाजवळ मोटारसायकलने जात असताना अचानक काही व्यक्तींनी कु-हाडीने सपासप वार करून जागीच ठार केले होते. या प्रकरणातील दोन आरोपींवर खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. हा निर्णय पुसद न्यायालयाचे न्यायाधीश अनिल सुब्रह्मण्यम यांनी सुनावली आहे.

ऑगस्ट २०१० रोजी धुंदी गावात आत्माराम वसराम जाधव याचा तिसऱ्या दिवशीचा कार्यक्रम झाल्यानंतर मृतक प्रकाश तुकाराम राठोड याच्या मोटारसायकलीवर भारत नरसिंग आडे आणि अनिल पुरासिंग आडे पुसद येथे जात होते. त्या वेळी धुंदी गावाच्या अलीकडे पुलावर आरोपी कैलास मधुकर हातात कुऱ्हाड घेऊन होते. मोटारसायकल जवळ येताच त्यांनी त्यांची दुचाकी पुढे टाकून प्रकाश, भारत अनिल यांना त्यांच्या दुचाकीवरून खाली पाडले. आरोपी कैलास मधुकर या दोघांनी त्यांच्याजवळ असलेल्या काठ्यांनी त्यांना मारहाण केली. त्यात प्रकाश हा जागेवरच मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपींपैकी मधुकर, रमेश अतुल हे फरार झाले होते. त्यांना जुलै २०११ रोजी पी. आर. सुळे यांनी अटक करून तपास हाती घेतला. हा तपास पूर्ण करून प्रकरण अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अनिल सुब्रह्मण्यम यांचे न्यायालयात सुनावणीकरिता आले असता अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सुधाकर ता. राठोड यांनी शासनातर्फे यांनी एकूण १५ साक्षीदार तपासले. आरोपी कैलास मधुकर यांच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने त्या दोघांना जन्मठेप प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
करणीचा होता वाद
जवाहरनगरधुंदी येथील मृतक प्रकाश तुकाराम राठोड हा इंडियन ऑइल कंपनी नागपूर येथे चालक म्हणून कार्यरत होता. त्याचे गावात जाणे-येणे सुरू होते. या प्रकरणातील आरोपी कैलास श्रीराम चव्हाण, मधुकर किसन राठोड, लक्ष्मीबाई किसन राठोड, शोभा मधुकर राठोड, सीमा रमेश राठोड, रमेश किसन राठोड, अतुल मधुकर राठोड यांचेसोबत घटनेचे आधी १५ वर्षांपासून कैलासच्या आईला करणी केली, या कारणावरून वाद सुरू होता. तरीही सर्व आरोपी मृतक प्रकाश याला जीवाने मारण्याच्या धमक्या देत होते.