आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आबा गेले...अन‌् पापण्या पाणावल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांच्या अचानक निघून जाण्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये दिवसभर अस्वस्थता दिसून आली. आबांच्या जाण्याने शहरातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसोबतच अनेकांच्या पापण्या पाणावल्या होत्या.
महाराष्ट्राचा सच्चा लोकनेता हरपला

आबांच्या रूपाने महाराष्ट्राने खरा लोकनेता गमावला. आबा राज्याचे लोकनेते होते. त्यांच्यासारखा नेता यापुढे होणे नाही. अत्यंत सामान्य कुटुंबातून एक सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांनी नाव कमावले होते. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी गृह खाते समर्थपणे हाताळले होते. ते आम्हा युवकांचे खरे प्रेरणास्थान होते. प्रदीप राऊत, युवक प्रदेश सरचिटणीस राकाँ.
मोठी पोकळी निर्माण झाली

आबा महाराष्ट्राचे मोठे नेते होते. त्यांच्या अचानक निघून जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आबा स्वच्छ, निष्कलंक, शांत स्वभावाचे नेते होते. त्यांच्या जाण्याने कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आमचे मार्गदर्शक हरपले. हृषीकेश वैद्य, ग्रामीण जिल्हाध्यक्ष
फोटो - दर्यापूर तालुक्यात २००७ मध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील आले होते. आता ही केवळ आठवण उरली आहे. संग्रहित छायाचित्र