आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावणसरीत रंगली महम्मद रफींच्या गीतांची मैफील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - प्रख्यात गायक महम्मद रफींचे चाहते अकोल्यात मोठ्या संख्येने असून, त्यातीलच एक डॉ. दीपक मोरे यांनी त्यांच्या पुण्यतिथीचा योग साधून श्रावण मासाच्या सरीत रफींच्या सदाबहार गीतांची मैफील 31 जुलैला रात्री त्यांच्या निवासस्थानी आयोजित केली होती.

सहा तास चाललेल्या या मैफलीत रफींच्या अजरामर गीतांची श्रोत्यांना चांगलीच पर्वणी लाभली. या मैफलीत गायक होते डॉ. दीपक मोरे, डॉ. प्रदीप बोरकर, प्रा. प्रकाश बोरकर, डॉ. मुकुंद तायडे, वंदना मोरे, परिमल बोरकर, धनराज सदांशिव, नीलेश राठोड, मेघश्याम सरकटे, श्रीकिसन जयस्वाल, चंदाताई जयस्वाल. या सर्वांनी एकापेक्षा एक सरस गाणी सादर केली. या गीतांच्या माध्यमातून महम्मद रफींना वाहिलेल्या श्रद्धांजलीत डॉ. दीपक मोरे यांनी गायलेली आज की रात मेरे दिलकी सलामी लेले, ये रेशमी जुल्फे, आनेसे उसके आये बहार आदी गीते चांगलाच भाव खाऊन गेली. बोरकर बंधूनीही श्रवणीय गीते सादर केली. चंदा जयस्वाल यांच्या रागभैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रशांत इंगळे, वंदना मोरे यांची वाद्यवृंदावरील साथ अप्रतिम होती. कार्यक्रमाचे संचालन प्रदीप खाडे यांनी केले. धनराज लाहोळे व त्यांच्या सहकाºयांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.