आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raging Issue At Sant Gadge Baba University, Amravati

रॅगिंग प्रकरणाची गंभीर दखल, रॅगर्सच्या शोधासाठी बी.टेक. विभागात बैठक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - बी.टेक.शिक्षण घेत असलेल्या मुलींची मुलांकडून रॅगिंग घेण्यात आल्याची गंभीर दखल संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रशासनाने घेतली आहे. रॅगिंग घेणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी तातडीने बी.टेक. विभागातील प्रथम वर्ष आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची बैठक गुरुवारी (दि.. १८) घेण्यात आली.

रॅगर्सने सीआरमार्फत मुलींना बोलावून घेतल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे. रॅगिंगसाठी मुलींना बोलावून घेण्यामागे या विद्यार्थ्यांचा नेमका हेतू काय होता, याचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी घाबरलेल्या मुलींनी अद्यापही तक्रार दाखल करण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. बी.टेक.चा सीआर किंवा पीडित मुलींपैकी कुणीही तक्रार दाखल केल्यास संबंधित विद्यार्थ्यांना ‘रस्टिकेट’ करण्याची तयारीही अमरावती विद्यापीठाच्या रॅगिंगविरोधी समितीने चालवली आहे.

‘दिव्य मराठी’ने अमरावती विद्यापीठातील या रॅगिंगबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली.

जनसंपर्क विभागाकडून या वृत्ताची कात्रणे कुलगुरू कार्यालय, कुलसचिव कार्यालय, बी.टेक. विभाग प्रमुख डॉ.. विलास सपकाळ यांच्यासह रॅगिंगविरोधी समितीलाही पाठवण्यात आली. त्यानंतर तातडीने बी.टेक. विभागात विद्यार्थ्यांची बैठक पार पडली. विभागप्रमुख डॉ. विलास सपकाळ हे पॅरिस येथे गेल्याने प्रा. डॉ. आर. एस. सपकाळ यांनी विद्यार्थ्यांची बैठक घेतली. या वेळी काही विद्यार्थिनींशीही संवाद साधण्यात आला. मात्र, घडलेल्या प्रकारामुळे विद्यार्थिनी चांगल्याच घाबरल्या असल्याने अद्याप तरी कुणीही तक्रार दाखल करण्यासाठी पुढे आलेले नाही.

माहिती अग्रेषित केली
बी.टेक.विभागाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यांनी तातडीने विद्यार्थ्यांची बैठकदेखील घेतली. अद्याप कुणीही अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही. नेमकी काय घटना घडली, हे आताच सांगता येणार नाही. या प्रकरणी संबंिधतांना माहिती देण्यात आली आहे. असा कोणताही प्रकार घडल्याची माहिती नाही. विलासनांदूरकर, जनसंपर्कअधिकारी.