आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raging Issue At Sant Gadge Baba University At Amravti

विद्यापीठात मुलांकडून बी.टेक.च्या मुलींची रॅगिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये बी.टेक. प्रथम वर्षाला शिकत असलेल्या मुलींची मुलांनी रॅगिंग केल्याचा प्रकार घडला. विद्यापीठातील सायकल स्टॅन्डजवळ बुधवारी (दि.१७) ही घटना घडली.

रॅगिंग करणारे मुलेही बी.टेक.चेच तृतीय वर्षांतील विद्यार्थी आहेत. प्रथम वर्षाला निवडून आलेल्या सीआरची या मुलांनी रॅगिंग घेण्यास सुरुवात केली. डगि्री हाती येईस्तोवर रॅगिंगपासून वाचायचे असेल, तर वर्गातील मुलींना आपल्याकडे पाठवावे लागेल, अशी धमकीही सीआरला दिली. सीनियरांनी दिलेल्या धमकीमुळे विद्यापीठातील सायकल स्टॅन्डजवळ हा सीआर मुलींसह दाखल झाला. या मुलींना चित्र-विचित्र प्रश्न विचारून रॅगिंग घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्रस्त केले. काहींनी मुलींचा नाव, गाव पत्ता, तर काहींनी त्यांची कौटुंबिक माहिती विचारली; काहींना यांपैकी काही मुलींचा मोबाइल क्रमांक हवा होता. मात्र, सार्वजनिक ठिकाणी जास्त रॅगिंग करता आल्याने संबंधित मुलींना जाण्यास सांगितले. या मुली बी.टेक.ची डगि्री हाती येईपर्यंत विद्यापीठाच्या वसतगिृहात राहणार आहेत. आपले ही केवळ थर्ड इयरच आहे. त्यामुळे आपल्याकडे मुलींचे क्रमांक आणि माहिती मिळवण्यासाठी बराच वेळ आहे, असे नमूद करीत रॅगर्सनी आजची रॅगिंग आटोपती घेतली. या घटनेने मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलांच्या बदनामीच्या भीतीने अद्याप कुणीही विद्यापीठाच्या रॅगिंग कमिटीकडे अधिकृतपणे तक्रार दाखल केलेली नाही.

तक्रार आल्यास नक्की कारवाई करू
रॅगिंगघेतल्याबाबत अधिकृतपणे कोणतीही तक्रार रॅगिंग कमेटीकडे आलेली नाही. पण असा प्रकार विद्यापीठामध्ये घडला असेल, तर तो गांभीर्यांनी घेतला जाईल. या प्रकरणाबाबत निश्चित चौकशी करून कारवाई केली जाईल. दिनेशजोशी, कुलसचिव.