आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Visit On Amravati District On Thursday

राहुल गांधी यांचे गुरुवारी जिल्ह्यात आगमन!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांदूर रेल्वे / अमरावती - अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी (दि. ३०) जिल्ह्यात येणार असून, चांदूर रेल्वे तालुक्यातील टोंगलाबाद, रामगाव, शहापूर या गावांतील आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेट देणार असल्याची माहिती काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष किरण विश्वकर्मा यांनी दिली.परंतु जिल्हाधिकारी कार्यालयात अद्याप त्यांचा नियोजित दौरा आला नसल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.

हा दौरा दोन दिवस राहण्याची शक्यता असून, राहुल गांधी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधणार आहेत. दोन दिवसांत अधिकृत दौरा येईल, असे विश्वकर्मा म्हणाले. दरम्यान, प्रभारी आरडीसी मोहन पातुरकर यांच्याशी संपर्क साधला असता, अद्याप राहुल गांधी यांचा नियाेजित दौऱ्याचे वेळापत्रक प्रशासनाला मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले.