आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी करणार १५ किमी पायपीट, उद्या एक दिवसाच्या अमरावती दौऱ्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ‘विदर्भातीलआत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या परिवारांचे सांत्वन करण्याकरिता काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी, ३० एप्रिलला एक दिवसाच्या अमरावती दौऱ्यावर येणार आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगावरेल्वे आणि चांदूररेल्वे तालुक्यातील आत्महत्या केलेल्या नऊ शेतकऱ्यांच्या परिवारांची राहुल गांधी भेट घेणार आहे. या वेळी गुंजी ते रामगावपर्यंत चार तासात १५ किलोमीटरची पदयात्रा राहुल गांधी काढणार आहे’, अशी माहिती काँग्रेसचे चांदूररेल्वे मतदारसंघाचे आमदार वीरेंद्र जगताप यांनी मंगळवारी, २८ एप्रिलला घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, आमदार यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष संजय अकर्ते, बबलू शेखावत यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
नागपूर अमरावतीजिल्ह्याच्या दौऱ्यावर जाण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे बुधवारी, २९ एप्रिलला रात्री नागपुरात आगमन होणार आहे. रात्री च्या सुमारास राहुल यांचे दिल्लीहून विमानाने नागपुरात आगमन होईल. रवी भवनात त्यांचा मुक्काम राहणार आहे. त्यानंतर गुरुवारी पहाटे ते अमरावती जिल्ह्याकडे प्रयाण करणार आहेत. सुमारे वर्षभरानंतर राहुल नागपुरात येणार असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मात्र, ते आपत्तीग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना भेटण्यासाठी येणार असल्याने शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचे नागपुरात छोटेखानी स्वागत केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. राहुल यांच्यासोबतच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे राहणार आहेत.

असा आहे दौरा
गांधीयांचे बुधवारी सायंकाळी नागपूर येथे आगमन होणार असून तेथे ते मुक्काम करतील. त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव (रेल्वे) या तालुक्यातील गुंजी येथे ते सकाळी च्या सुमारास वाहनाने पोहोचतील. या गावात आत्महत्या केलेले नीलेश वाळके अंबादास वाहिले या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ते भेटतील. त्यानंतर किमी अंतरावर असलेल्या शहापुरात जाऊन किशोर नामदेव कांबळे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेतील. यानंतर या गावापासून किमी अंतरावर असलेल्या चांदूर रेल्वे तालुक्यातील रामगाव येथे पायी जाऊन कचरू तुपसुंदरे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतील. त्यानंतर १३ किमी अंतरावर असलेल्या राजना येथे वाहनाने जाऊन मारोतराव नेवारे यांच्या कुटुंबीयांना भेटतील. यानंतर टोंगलाबाद या गावी जाऊन आत्महत्या केलेल्या माणिक ठवकार, अशोक सातपैसे, रामदास अडकिने, शंकर अडकिने यांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांच्याशी चर्चा करतील. दुपारी वाजता टोंगलाबाद येथून कारने नागपूरकरिता प्रयाण करतील.

दानवे म्हणतात-शेतकऱ्यांना देणेघेणे नाही : ‘भूसंपादनिवधेयकाविरोधात राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या आंदोलनाशी शेतकऱ्यांना काही देणेघेणे नाही. हे आंदोलन मूठभर नेत्यांचे आहे,’ अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नागपुरात केली.