आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Patil News In Marathi, Social Media, The Community Of Amravati Citizens

घे भरारी: अमरावतीकर तरुणांची सोशल साइट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - फेसबूकसारखेच, पण त्यापेक्षा अद्ययावत तंत्रज्ञान वापरून शहरातील राहुल पाटील व रोहिणी टोळ यांनी सोशल साइट विकसित करून अमरावतीकरांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.‘द कम्युनिटी ऑफ अमरावतीकर पीपल’ नावाने नवीन सोशल नेटवर्किंग साइट कार्यान्वित केल्याचे पाटील व टोळ यांनी सांगितले. त्यासाठी पीएचपी- 5 तंत्रज्ञान व झेंड फ्रेमवर्कचे व्हर्जन-2 चा वापर करण्यात आला आहे. हुबेहूब फेसबूकप्रमाणेच ही साइट असल्याचा दावा त्यांनी केला आहे. क्लाइफाइड, फोरम, पोल्स, म्युझिक असे विविध अँप्लिकेशन यामध्ये आहेत. तरुणाईला जोडण्याचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. युर्जसला ‘अमरावती.कॉम’ नावाने यूआरएलवर लॉग-इन करता येणार आहे. विशेष म्हणजे, फेसबूकवरूनदेखील या पेजवर लॉग-इन करणे शक्य आहे. भविष्यात ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साइटवरूनदेखील युर्जसला लॉग-इन करता येणार आहे. त्यासाठी संशोधन सुरू असल्याचे ते म्हणाले.


मागील सहा महिन्यांपासून साइटवर संशोधन सुरू होते. दरम्यान, पंधरा दिवसापासून कामाला गती आल्याचे त्यांनी नमूद केले. साइट अजून अद्ययावत बनवण्याच्या प्रयत्नात असून लवकरच साइटचा वापर करणार्‍या युर्जसला नवा प्रयोग बघायला मिळणार असल्याचेही पाटील व टोळ यांनी सांगितले. त्यांच्या या प्रयोगाचे अमरावतीकर तरुणाईने दणक्यात स्वागत केले आहे.


लवकरच अँड्रॉइड अँप्स युर्जसच्या भेटीला
कुठल्याही ब्राउझरवरून या साइटवर लॉग-इन करता येईल. मोबाइलवरूनदेखील होमपेज बघता येणार आहे. साइटचा आयपी अँड्रेस निर्मात्यांनी हाइड करून ठेवला आहे. त्यामुळे हॅकिंगपासून साइटचा बचाव होणार आहे. साइटची अकाउंट तसेच प्रायव्हसी सेटिंगही अद्ययावत बनवण्यात आली आहे.


अद्ययावत सुविधा
युर्जस लॉग-इन होमपेजवर मेंबर्स, अल्बम, क्लासिफाइड, पोल, चाट, फोरम, इव्हेंट, म्युझिक, व्हिडीओ आदी अप्लिकेशन बघायला मिळतील. अल्बमध्ये युर्जसला स्वत:चे अल्बम बनवून केव्हाही ऑनलाइन गाणे ऐकता येणार आहे.