आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीसह तिवस्यातील आयपीएल सट्ट्यांवर छापा, २० हजार रुपये, लॅपटॉप एलसीडी जप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- तिवसा येथील एका ड्रायफुड कोल्ड्रींग्सच्या दुकानातून आयपीएलचा सट्टा चालविण्यात येत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी (दि. ११) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास या दुकानात धाड टाकली. त्यावेळी दुकानातून २० हजारांची रोख अन्य साहित्य जप्त केले आहे. दरम्यान रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास गुन्हे शाखा पोलिसांनी शहरातील गुलशन टॉवरमध्ये सट्ट्यावर धाड टाकली.
राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तिवसा येथील यश ड्रायफुड अॅन्ड कोल्ड्रींग्स नावाचे हरीष तहलानीचे दुकान आहे. या दुकानातून आयपीएलचा सट्टा सुरू असून या सट्ट्यापोटी या दुकानातून दरदिवशी लाखोंची उलाढाल होत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती. याच माहितीच्या आधारे सोमवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तिवस्यात दाखल झाले. पोलिसांनी दुकानात धाड टाकली असता सट्टा सुरू असल्याची पोलिसांची खात्री झाली. यावेळी पोलिसांनी दुकानातून एक एलसीडी, लॅपटॉप वीस हजारांची रोख जप्त केली आहे. या ठिकाणी चिठ्ठीवर लिहून सट्टा लावल्या जात होता.
वास्तविक: या ठिकाणी दरदिवशी लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची चर्चा आहे. मात्र पोलिसांनी धाड टाकली त्याच दिवशी मात्र ही उलाढाल वीस हजारांवर येऊन थांबली होती. ही लाखो रुपयांची उलाढाल वीस हजार रूपयांवर कशी येऊन ठेपली, अशी चर्चा पोलिसांच्या कारवाईनंतर सुरू झाली होती. मात्र या कारवाईने संपुर्ण जिल्ह्यातील सट्टा चालवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
ही कारवाई एपीआय नीलेश सुरडकर यांच्या नेतृत्वात ज्ञानेश्वर सहारे, संजय तायडे, सुधीर पांडे, आशिष इंगळे, शेख सईद आणि नितीन शेंडे यांनी केली आहे. यंदा वर्षातील आयपीएल सट्ट्याची ग्रामीण पोलिसांची ही पहिलीच कारवाई आहे.
शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गुलशन टॉवरमध्ये आयपीएलवर सट्टा सुरू होता. पोिलसांनी धाड टाकली त्यावेळी सात व्यक्ती सट्टा खेळत असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले या ठिकाणाहून पंचवीस हजाराच्या जवळपास रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. वृत्त लिहिस्तोवर पोलिस कारवाई सुरूच होती. सोमवारी सायंकाळी शहर गुन्हे शाखेचे अधिकारी वीस कर्मचाऱ्यांनी तीन ठिकाणी धाड टाकली.
बातम्या आणखी आहेत...