आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील ३० अवैध दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मुंबई येथील मालवणी भागात विषाक्त दारू पिल्यामुळे मागील चार दिवसांत जवळपास ९१ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारपासून शहरातील सर्वच पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध दारू गावठी दारूच्या गुत्त्यावर धाड टाकण्यात आल्या. गत २४ तासात पोलिसांनी ३० ठिकाणी धाड टाकून जवळपास ६६ हजार रुपयांची दारू जप्त केली आहे. रविवारी (दि. २१) उशिरापर्यंत कारवाई सत्र सुरूच होते.
पोलिस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी दिलेल्या आदेशामुळे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सुरू असलेल्या गावठी हातभट्टी, देशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या व्यावसायिकाविरुद्ध ही मोहीम राबविण्यात आली आहे. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे तीन पथक तसेच फ्रेजरपुरा, शहर कोतवाली, बडनेरा, नांदगाव पेठ, वलगाव, गाडगेनगर, खोलापूरी गेट, नागपूरी गेट, गाडगेनगर पोलिसांनी आपापल्या हद्दीत धाड सत्र राबविले होते. यामध्ये रविवारी सायंकाळपर्यंत जवळपास ६६ हजार ६६० रुपयांची गावठी देशी दारू जप्त करण्यात आली होती. तसेच गावठी हात भट्टीवर धाड टाकून दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्यसुद्धा जप्त करण्यात आले आहे.
या कारवाईमध्ये गुन्हे दाखल झालेल्या आरोपींना नोटीस बजावल्या आहे. अशी माहिती पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...